हडकंप! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले; आठ फुटी रॉकेट सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:32 PM2020-08-19T14:32:39+5:302020-08-19T14:34:13+5:30

रघुनाथ दास आणि अन्य सात मच्छीमार त्यांची मशीनची बोट घेऊन समुद्रात 250 किमी दूरवर गेले होते. यावेळी त्यांच्या जाळ्यात हे रॉकेट अडकले.

eight-foot rocket was found Fishermen nets into the sea | हडकंप! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले; आठ फुटी रॉकेट सापडले

हडकंप! मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळे फेकले; आठ फुटी रॉकेट सापडले

Next

भुवनेश्वर : बालेश्वर जिल्ह्यातील समुद्रात मच्छिमारांच्या जाळ्यात मोठे रॉकेट सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. समुद्रात खोलवर मच्छिमार काही नौका घेऊन मासेमारीसाठी गेले होते. यावेळी त्यांच्या जाळ्यात जड वस्तू सापडली. शंका आली म्हणून त्यांनी खूप प्रयत्न करून जाळे पाण्याबाहेर काढले. पाहताच त्यांना धक्का बसला. रॉकेटसारखी दिसणारी वस्तू त्यांच्या जाळ्यात सापडली होती. 


ही घटना बालेश्वर जिल्ह्यातील रेमुणा ब्लॉकच्या तलपडा जवळ घडली. रघुनाथ दास आणि अन्य सात मच्छीमार त्यांची मशीनची बोट घेऊन समुद्रात 250 किमी दूरवर गेले होते. यावेळी त्यांच्या जाळ्यात हे रॉकेट अडकले. हे रॉकेट विमानासारखे होते. या रॉकेटचे वजन जवळपास 50 किलो व लांबी 8 फूट आहे. जाळ्यात रॉकेट सापडल्याची माहिती मिळताच लोकांनी समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली. 


यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दुसरीकडे हे रॉकेट सापडल्याचे सैन्य दलाला समजताच त्यांच्याकडून खुलासा आला आहे. आयटीआर चांदीपूरचे प्रमुख विनय कुमार यांनी लोकांना घाबरण्याचे काही कारण नसल्याचे सांगितले. हे रॉकेट भारतीय हवाई दलाचे असून एका नियमित युद्धाभ्यासादरम्यान सोडलेले आहे. हे रॉकेट रिमोटद्वारे सुरु होते. 


या टार्गेट एअरक्राफ्टला एक्सपांडेबल एअरक्राफ्ट म्हटले जाते. याचा वापर झाल्यावर ते पाण्यात सोडले जाते. हे रॉकेट फायबरचे बनलेले असते. यामुळे त्याच्या पुनर्वापर शक्य नसतो. काही मच्छीमारांनी हे रॉकेट समुद्र किनाऱ्यावर आणले आहे. यात काही चुकीचे नाहीय. हे रॉकेट लढाऊ विमानांसाठी लक्ष्य म्हणून वापरले जाते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात

Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर

जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?

वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का

Indian Railway Recruitment 2020: परिक्षा नाही! रेल्वेमध्ये बंपर भरती; 10वी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी

Micromax आठवतेय का? चिनी कंपन्यांचा बदला घेणार; नवे स्मार्टफोन आणणार

SBI ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घ्या नाहीतर दंड भरा

महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग

Web Title: eight-foot rocket was found Fishermen nets into the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.