शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

‘गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबवा’

By admin | Updated: August 28, 2016 00:37 IST

केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांची एक बैठक शनिवारी दिल्लीत झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात शाह यांनी सांगितले की, सध्या भाजपा देशातील ५७ टक्के भूभागावर, तसेच ३७ टक्के लोकसंख्येवर राज्य करत आहे. मोदी सरकारकडून गरिबांसाठी सुमारे ८0 योजना राबविल्या जातात. त्यापैकी ६५ योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. अशा परिस्थितीत भाजपाशासित राज्यांची या कल्याणकारी योजनांच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे. मे २0१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांनी राज्य शाखांच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीत ‘गरिबांचे हित आणि सुशासन’ या विषयीचा अजेंडा ठेवण्यात आला. सध्या भाजपा दलित आणि अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. अशा कठीण प्रसंगी कल्याणकारी योजना आणि गरिबांवर विशेष लक्ष दिल्यास राजकीय संकटातून वाचता येऊ शकेल, असे भाजपात मानले जात आहे. शाह यांनी सांगितले की, भाजपाने देशात कामकाजाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. भाजपाची राज्यांतील सरकारे केवळ आपल्या चांगल्या कामाच्या बळावर वारंवार निवडून आली आहेत. गरिबांसाठी कल्याणकारी राज्य बनविणे आणि सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे, ही केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)वसुंधरा राजे गैरहजरया महत्त्वाच्या बैठकीला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे मात्र गैरहजर राहिल्या. त्यांनी स्वत: येण्याऐवजी ज्येष्ठ मंत्र्यांना बैठकीला पाठविले होते. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची ही पहिली बैठक होती.