शिक्षण विभागाने मागवला रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल
By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:33+5:302016-02-03T00:28:33+5:30
जळगाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने मागवला रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल
ज गाव : जि.प. प्राथमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राथमिक शिक्षण विभागातर्फे मागवण्यात आली आहे. याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना सूचना देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ या कालावधीत जिल्ात एकूण ८३८ शिक्षकांची पदे रिक्त होती. जिल्हाभरातील जि.प. शाळांमध्ये अजुनही शिक्षकांची पदे रिक्त आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याचे चित्र जि.प. प्राथमिक शाळांमध्ये दिसत आहे. पुढील महिन्यात शैक्षणिक वर्ष २०१५ व २०१६ सालात रिक्त असलेल्या शिक्षकांचा अहवाल प्राप्त होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ या कालावधीत रिक्त शिक्षकांची पदे अशी : अमळनेर २१भुसावळ ३१भडगाव ४८बोदवड ४०चोपडा ६४चाळीसगाव ९४धरणगाव २५एरंडोल ३४जळगाव ३९जामनेर १२१मुक्ताईनगर ७०पारोळा ३७पाचोरा ७७रावेर ८८यावल ४९