शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:26 IST

ईडीने काँग्रेसचे मंत्री आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले.

ED raid in Ranchi : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) झारखंडची राजधानी रांचीमध्ये सोमवारी(दि.6 मे) अनेक ठिकाणी छापे टाकले आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा काँग्रेस नेते आलमगीर आलम यांच्या निकटवर्तीयाकडून बेहिशेबी रोकड जप्त केली. नोटांचा ढीग पाहून ईडीचे अधिकारीही हैराण झाले. इतक्या नोटा आहेत की, त्या मोजण्यासाठी मशीन मागवाव्या लागल्या. 25-30 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. या रोकडशिवाय काही कागदपत्रेही समोर आली असून, हे पैसे ट्रान्स्फर पोस्टिंगसाठी घेतल्याचा अधिकाऱ्यांना संश आहे. 

आलमगीर आलम यांची पहिली प्रतिक्रियाया घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे, ज्यात आलमगीर आलम यांचे खाजगी सचिव असलेले संजीव लाल, यांच्या नोकराच्या घरात नोटांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिसत आहेत. आता याप्रकरणी मंत्री आलमगीर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजीव लाल आमचे पीएन आणि सरकारी अधिकारी आहेत. याआधीही ते दोन मंत्र्यांचे पीए होते. अनुभवाच्या आधारे आम्ही सचिवांची नियुक्ती करतो. मी टीव्हीवरच कारवाईची बातमी पाहिली. ईडी आपले काम करत आहे, निष्पक्ष तपास होईपर्यंत त्यावर काहीही बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया आलमगीर आलम यांनी दिली.

ईडीने आलमगीर यांना तात्काळ ताब्यात घ्यावे - भाजपची मागणीदरम्यान, यावरुन भाजपने आलमगीर यांना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. झारखंड भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, या रोकड वसुलीने काँग्रेस काळ्या पैशाच्या व्यवसायात गुंतल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. झारखंड सरकारच्या भ्रष्टाचाराची न संपणारी कहाणी अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच एका काँग्रेस खासदाराच्या घरातून 300 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्या घरातून 10 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आता मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवच्या नोकराच्या घरातून 23-30 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. आलमला तात्काळ ताब्यात घेण्यात यावे आणि त्यांची सखोल चौकशी करुन या पैशांशी काय संबंध आहे, याचा ईडीने शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.

१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंडraidधाडcongressकाँग्रेसBJPभाजपा