EcoR officers plan gifts for babies born on board Shramik Special trains in their zone | श्रमिक ट्रेनमध्ये जन्मलेल्या बाळांना मिळणार स्पेशल गिफ्ट!

श्रमिक ट्रेनमध्ये जन्मलेल्या बाळांना मिळणार स्पेशल गिफ्ट!

ठळक मुद्देईस्ट कोस्ट  रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील श्रमिक विशेष गाड्यांमध्ये तीन मुलांचा जन्म झाला. तिन्ही मुले व त्यांच्या माता यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

नवी दिल्ली : देशात कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) अडकलेल्या लोकांसाठी श्रमिक विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. भारतीय रेल्वे आता या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमध्ये जन्मलेल्या मुलांना भेटवस्तू देणार आहे.  

दरम्यान, लॉकडाऊनदरम्यान देशाच्या विविध भागात सुरु करण्यात आलेल्या या श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांमध्ये अनेक मुलांचा जन्म झाल्याचे समोर आले आहे. भारतीय रेल्वे मुलांचा जन्म झाल्यामुळे शुभ मानत असून या सर्व मुलांना भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे.

ईस्ट कोस्ट  रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील श्रमिक विशेष गाड्यांमध्ये तीन मुलांचा जन्म झाला. तिन्ही मुले व त्यांच्या माता यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या तिन्ही मुलांपैकी दोन मुलांचा जन्म तितिलागड आणि एकाचा बालनगीरमध्ये झाला. म्हणजेच, तिन्ही मुलांचा जन्म ओडिशाच्या बालनगीर जिल्ह्यात झाला.

ECoRच्या अंतर्गत जन्मलेल्या मुलांना गिफ्ट कूपन दिले जातील. या उपक्रमांतर्गत त्यांनी तीन मुलांच्या पालकांना भेट म्हणून 5-5 हजार रुपयेही दिले. श्रमिक विशेष गाड्यांमध्ये जन्मलेल्या मुलांना रेल्वे अधिकारी सरकारी खर्चातून नव्हे तर स्वत: हून भेटवस्तू देतील, असे ईस्ट कोस्ट रेल्वेचे जनरल मॅनेजर विद्याभूषण यांनी शुक्रवारी सांगितले.

आणखी बातम्या...

ज्योतिरादित्य सिंधियांनी ट्विटरवरून 'भाजपा' हटविले?, चर्चांना उधाण!

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक, भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

मुंबई, ठाण्यासह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात, सखल भागांमध्ये पाणी साचले

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: EcoR officers plan gifts for babies born on board Shramik Special trains in their zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.