Piyush Goyal mother ChandraKanta Goyal passed away | रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक, भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक, भाजपा नेत्या चंद्रकांता गोयल यांचे निधन

ठळक मुद्देपीयूष गोयल यांच्या ट्विटनंतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबई : केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना मातृशोक झाला आहे. पीयूष गोयल यांच्या आई चंद्रकांता गोयल यांचे शनिवारी सकाळी निधन झाले आहे. पीयूष गोयल यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. चंद्रकांता गोयल या महाराष्ट्र विधान परिषदेवर बरीच वर्षे आमदार होत्या.

“आपल्या आपुलकीने आणि प्रेमाने मला मार्ग दाखवणारी माझी आई चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी निधन झाले. आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी लोकांची सेवा केली. मलाही त्यांनी लोकांची सेवा करावी, अशी प्रेरणा दिली. ईश्वर त्यांना त्यांच्या चरणाशी जागा देवो, ॐ शांती,” असे ट्विट पीयूष गोयल यांनी केले आहे.

पीयूष गोयल यांच्या ट्विटनंतर अनेक पक्षाच्या नेत्यांनी चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पूनम महाजन यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरवरून चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली. चंद्रकांता गोयल या भाजपा नेत्या होत्या. त्या मांटुगा विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Piyush Goyal mother ChandraKanta Goyal passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.