शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

"EVM हॅक करणाऱ्याला निवडणूक आयोगाने...."; निकालाआधी काँग्रेसच्या उमेदवाराचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 09:01 IST

Lok Sabha Election 2024, Pratap Singh Khachariyawas: मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएम बद्दल चर्चा होणे ही नवी गोष्ट नाही.

Lok Sabha Election 2024, EVM machine: लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान १ जूनला पूर्ण झाले. आज ५४३ पैकी ५४२ जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. मतमोजणीच्या दिवशी आणखी एक गोष्ट सातत्याने चर्चेत असते ती म्हणजे, EVM मशिन. EVM मशिनमध्ये छेडछाड केली जात असल्याचा आरोप अनेक वेळा विरोधकांकडून केला जात आहे. तर इव्हीएममध्ये काहीही छेडछाड केली जाऊ शकत नाही, असे निवडणूक आयोगाने (Election Commission of India) वारंवार सांगितले आहे. असे असताना आता काँग्रेसचे जयपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रताप सिंह खाचरियावास (Pratap Singh Khachariyavas) यांच्याकडून एक विधान करण्यात आले आहे.

काँग्रेस नेते मतमोजणीआधी म्हणाले, "भारतीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) हॅक करणाऱ्याला बक्षीस जाहीर केले पाहिजे आणि जर कोणी हे उपकरण यशस्वीरित्या हॅक केले तर ही मोजणी यंत्रणा त्वरित बदलली पाहिजे. ईव्हीएमवर इतके प्रश्न उपस्थित केले जात असतील, तर या निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर, निवडणूक आयोगाने पुढे येऊन ईव्हीएम लोकांसमोर ठेवावे. हॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवून EVM हॅक करण्याचा प्रयत्न करू द्यावा आणि जर तसे कोणी केले, त्यांना बक्षिस द्यावे," असे खाचरियावास म्हणाले.

"EVM मध्ये प्रोग्रामिंग कोण अपलोड करत आहे? तुम्ही उमेदवारांना समान प्रोग्रामिंग देत नाही. ज्याची चर्चा होत नाही. हा कार्यक्रम उमेदवारांना उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत. पण निवडणूक आयोगाला हे करायचे नाही. त्यामुळे त्यांनी हे करावे. सत्य बाहेर येईल. निवडणूक आयोगाला हे मान्य असेल का? निवडणूक आयोग पारदर्शक असला पाहिजे. जो कोणी हॅक करेल त्याला निवडणूक आयोगाने बक्षीस जाहीर करावे आणि जर कोणी ते हॅक करू शकत असेल तर मतदान प्रक्रिया बदलून घ्यावी," असे आव्हान खाचरियावास यांना दिले.

दरम्यान, विशेष म्हणजे 2017 मध्ये निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ईव्हीएम चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. फक्त दोन विरोधी पक्षांनी - NCP आणि CPI(M) यांनी हे आव्हान स्वीकारले होते, मात्र नंतरच्या टप्प्यात त्यांनाही ते शक्य झाले नव्हते.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगEVM Machineएव्हीएम मशीन