BREAKING: दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के, जम्मू-काश्मीरमध्येही हादरे; केंद्र अफगाणिस्तानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:22 IST2023-01-05T20:21:31+5:302023-01-05T20:22:48+5:30
दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र आहेत की जम्मू-काश्मीरपर्यंत हादरे बसले आहेत.

BREAKING: दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के, जम्मू-काश्मीरमध्येही हादरे; केंद्र अफगाणिस्तानात
नवी दिल्ली-
दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के इतके तीव्र आहेत की जम्मू-काश्मीरपर्यंत हादरे बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ५.९ रिश्टर स्केल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावरुनच भूकंपाच्या धक्क्यांचा अंदाज लावता येईल. भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तान असल्याचं सांगितलं जात आहे.
An earthquake with a magnitude of 5.9 on the Richter Scale hit 79km South of Fayzabad, Afghanistan at 7:55 pm today: National Centre for Seismology pic.twitter.com/2Zn9oXeEnC
— ANI (@ANI) January 5, 2023
भूकंपात अद्याप कोणत्याही जीवीतहानीची माहिती समोर आलेली नाही. पण लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याआधीही दिल्ली-एनसीआर भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे दिल्ली-एनसीआर भाग आता भूकंपाच्या दृष्टीकोनातून संवेदनशील बनत चालला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी देखील देशात विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले होते. १ जानेवारी रात्री उशिरा ११ वाजून २८ मिनिटांनी मेघालयच्या नोंगपोह येथे ३.२ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. पण यावेळी ५.९ रिश्टर स्केल तीव्रता असल्यानं काळजी व्यक्त होत आहे.