आसाममध्ये रविवारी (14 सप्टेंबर, 2025) सायंकाळी 4:41 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. संबंधित आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे मुख्य केंद्र आसाममधील उदलगुडी येथे जमीनीपासून पाच किलोमीटर आत रेकॉर्ड करण्यात आले. आसामशिवाय, भूटान आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागातही या भूकंपाचे झटके जाणवले.
गुवाहाटीमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता 5.8 मोजली गेली. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवीत अथवा वित्त हाणीचे वृत्त नाही. या भूकंपाचे झटके, आसामसह मेघालय, नागालँड आणि मणिपूर सारख्या ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांतही जाणवले.लोकांमध्ये भीतीचे वातावरण - काही सेकंदांपर्यंत चाललेल्या या भूकंपांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, असे स्थानिकांनी म्हटले आहे. मात्र, लवकरच परिस्थिती सामान्य झाली. प्रशासनाने लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, या भूकंपानंतर, आणखी धक्क्याची शक्यता लक्षात घेता, निगराणी वाढविण्यात आली आहे.
दोन आठवड्यांपूर्वीही आसामला बसले होते धक्के - याआधी, साधारणपणे दोन आठवड्यांपूर्वी 2 सप्टेंबरला देखील आसाममध्ये भूकंपाचे झटके जाणवले होते. सोनितपूरची भूमी 3.5 तीव्रतेच्या भूकंपाने हादरली होती.