'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:04 IST2025-11-04T12:02:58+5:302025-11-04T12:04:41+5:30
Shashi Tharoor on Dynastic Politics: घराणेशाहीवर शशी थरुरांचा स्फोटक लेख; भाजपकडून कौतुक, थर काँग्रेसवर टीकेची झोड!

'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
नवी दिल्ली :काँग्रेस नेते शशी थरूर आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा 'राजकारणातील घराणेशाही'बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. थरुरांनी भारतीय लोकशाहीसाठी 'घराणेशाहीचे राजकारण' घातक असल्याचे म्हटले. याचा थेट परिणाम प्रशासनाच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे, घराणेशाही राजकारणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी एका लेखातून व्यक्त केले. दरम्यान, थरुर यांच्या या लेखानंतर, भाजपने त्यांना 'खतरों के खिलाडी' म्हटले आहे.
शशी थरुर यांनी प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या “Indian Politics Are a Family Business” लेखात घराणेशाही राजकारणाबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष घराणेशाही राजकारणात अडकला आहे. प्रत्येकजण स्वतःच्या घराणेशाहीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे चुकीचे आहे. असे केल्याने प्रशासनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. जेव्हा असे होते तेव्हा लोकशाहीचा खरा अर्थ पूर्ण होत नाही.
Dr Tharoor has become Khatron ke Khiladi
— Shehzad Jai Hind (Modi Ka Parivar) (@Shehzad_Ind) November 3, 2025
He has directly called out Nepo Kids or Nawabs of Nepotism
Sir when i called out Nepo Naamdar Rahul Gandhi in 2017 - you know what happened to me
Sir praying for you…
First family is very vengeful https://t.co/yvaMEY8vtI
विविध पक्षांचे उदाहरण देत थरूर पुढे म्हणतात की, काँग्रेस तसेच समाजवादी पक्ष, राजद, शिवसेना (उद्धव गट) आणि द्रमुक यांसारख्या अनेक इंडिया आघाडीतील पक्षांत नेतृत्व पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होत आले आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, यांनीच भारतीय राजकारणात नेतृत्व हे जन्मसिद्ध हक्क असल्याची कल्पना दृढ केली. दरम्यान, या लेखाचे भाजपकडून कौतुक करण्यात आले आहे.
भाजपची प्रतिक्रिया
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी थरुर यांच्या लेखाचे वर्णन “सखोल आणि विचारप्रवर्तक” असे केले असून, थरूर यांना “खतरों के खिलाड़ी” असे संबोधत आपल्या पक्षातील राजकीय घराणेशाहीवर थेट प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कौतुक केले. पूनावाला म्हणाले, “थरूर यांनी अत्यंत विचारपूर्वक सांगितले आहे की, गांधी परिवाराने भारतीय राजकारणाला ‘फॅमिली बिझनेस’मध्ये बदलले.”
Delhi: BJP National Spokesperson Shehzad Poonawalla says, "Today, I read Shashi Tharoor’s insightful piece, in which he explains in great detail how Indian politics has increasingly become like a family business. He begins his article by referring to Congress’s first family,… pic.twitter.com/EMVv8xsuSc
— IANS (@ians_india) November 3, 2025
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही थरुर यांच्या निरीक्षणांचे समर्थन करत म्हटले की, “थरुर यांचा अनुभवावर आधारित लेख काँग्रेस आणि राजदला निश्चितच त्रासदायक ठरेल, कारण त्यांचे राजकारण फक्त कुटुंबापुरते मर्यादित आहे.”
काँग्रेसची प्रतिक्रिया
#WATCH | Delhi: On Congress MP Shashi Tharoor's recent essay, Congress leader Rashid Alvi says, "... The public makes the decisions in a democracy... You cannot impose a restriction that says you cannot contest elections because your father was an MP.... This is happening in… pic.twitter.com/T3QpFDtEoq
— ANI (@ANI) November 3, 2025
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी मात्र या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “वंशवाद केवळ राजकारणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात दिसतो. लोकशाहीत शेवटी निर्णय जनता घेते. एखाद्याचे वडील खासदार होते म्हणून त्याच्या निवडणुकीवर बंदी घालता येत नाही.”