मोठ-मोठ्या बांधकामातील धुळीमुळे शहरांचे आरोग्य धोक्यात; ‘सीईईडब्ल्यू’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 08:14 IST2026-02-10T08:14:29+5:302026-02-10T08:14:59+5:30

या प्रदूषणाचा थेट परिणाम बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या आणि शहरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. 

Dust from large-scale construction projects is putting the health of cities at risk; CEEW report | मोठ-मोठ्या बांधकामातील धुळीमुळे शहरांचे आरोग्य धोक्यात; ‘सीईईडब्ल्यू’चा अहवाल

मोठ-मोठ्या बांधकामातील धुळीमुळे शहरांचे आरोग्य धोक्यात; ‘सीईईडब्ल्यू’चा अहवाल

नवी दिल्ली - काैन्सिल ऑन एनर्जी, इन्व्हायर्नमेंट ॲन्ड वॉटर (सीईईडब्ल्यू)च्या अलीकडील अभ्यासातून अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, दिल्ली, अमृतसर आणि चंदिगडसारख्या प्रमुख शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रातील धूळ वायू प्रदूषणाचे एक प्रमुख कारण बनत आहे. या धुळीचा पीएम-२.५ च्या एकूण उत्सर्जनात सुमारे १८ ते २० टक्क्यांपर्यंत वाटा आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम बांधकाम साईटवर काम करणाऱ्या मजुरांच्या आणि शहरात राहणाऱ्यांच्या आरोग्यावर होत आहे. 

प्रदूषणामुळे कोणते आजार?

मजुरांना सीओपीडी, सिलिकोसिस, क्रोनिक ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग आणि मूत्रपिंडाचे विकारासारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. अहवालात स्पष्ट केले आहे की फिनिशिंग, कटिंग, ड्रिलिंग, पेंटिंग, ढलाई व मसाला तयार करण्यासारख्या कामांदरम्यान मजूर थेट धुळीच्या संपर्कात येतात.  

भारतात बांधकाम क्षेत्राची स्थिती

गुंतवणूक : २०२८ पर्यंत बांधकाम क्षेत्रात ३६.५८ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
रोजगार : या क्षेत्रात ४ कोटी लोकांना रोजगार मिळतो.
जीडीपीमधील वाटा : सध्याच्या जीडीपमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा ८ टक्के आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी... 

बांधकाम साईटच्या ठिकाणी सतत पाणी शिंपडणे गरजेचे. .

मजुरांना मास्क उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.

पीएम-२.५ वर देखरेखीसाठी सेन्सर लावणे गरजेचे आहे.

धोक्याच्या आकलनासाठी ‘कंट्रोल ऑफ सबस्टेंन्स हॅझर्ड्स टू हेल्थ’ टूलचा वापर करणे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाने नवे ‘कन्स्ट्रक्शन ॲन्ड डमोलिशन वेस्ट रूल्स’ व एसओपी जारी केली आहे.

Web Title : निर्माण धूल से शहरों का स्वास्थ्य खतरे में: सीईईडब्ल्यू की रिपोर्ट

Web Summary : निर्माण धूल दिल्ली, अमृतसर, चंडीगढ़ को प्रदूषित करती है, पीएम2.5 उत्सर्जन में 18-20% का योगदान करती है। मजदूरों को गंभीर श्वसन रोग होते हैं। प्रदूषण कम करने के लिए पानी का छिड़काव, मास्क, सेंसर और खतरे के आकलन उपकरण जरूरी हैं। प्रदूषण नियंत्रण बोर्ड ने नए नियम जारी किए।

Web Title : Construction Dust Threatens City Health: CEWEW Report Highlights Pollution

Web Summary : Construction dust significantly pollutes Delhi, Amritsar, Chandigarh, contributing 18-20% to PM2.5 emissions. Laborers face severe respiratory illnesses. The report urges water sprinkling, masks, sensors, and hazard assessment tools to mitigate pollution, citing new regulations by pollution control boards.