‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:06 AM2019-03-08T05:06:51+5:302019-03-08T05:07:12+5:30

देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे.

Due to the stubbornness of her, the park is doing it through the dump | ‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

‘ती’च्या जिद्दीमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून साकारत आहे उपवन

Next

- कुमार सिद्धार्थ

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदूर शहराला मान मिळाला आहे. इंदूर नगरपालिकेच्या मॅराथॉन अभियानामुळे ४० वर्षापासून तयार झालेल्या कचºयाच्या टेकड्यांचे रूप अखेर पालटले आहे. केवळ चार महिन्यात १३ लाख टन दुर्गंधीयुक्त कचºयाचे मोठे ढिगारे आता हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत असून हे स्थान ‘सिटी फॉरेस्ट’ म्हणून विकास पावत आहे. याचे श्रेय जाते ते शहराच्या महापौर मालिनी गौर यांच्या जिद्दीला. त्यांनीच हा संकल्प केला आणि तो पूर्णही करून दाखविला.
इंदूर शहराच्या बायपास रोडवर देवगुराडिया क्षेत्रात जवळपास १५० एकरमध्ये पसरलेल्या टेचिंग ग्राऊंडवर गेल्या ४० वर्षापासून शहराचा कचरा जमा केला जात होता. दरवर्षी यामध्ये भर पडत तो तब्बल १३ लाख टन होऊन टेकडीचे रुप आले.
देवगुराडियाच्या ट्रेचिंग ग्राऊंडवरील ही कचºयाची टेकडी हटविण्यासाठी मागील वर्षी आॅगस्टमध्ये एक निर्धार केला गेला. यासाठी १७ अर्थ मुव्हिंग मशीन भाड्याने आणली गेली आणि आठ-आठ महिन्याच्या शिफ्टमध्ये १५०-१५० मजुरांच्या मदतीने सतत चार महिने अभियान चालविण्यात आले. मशीन्सच्या मदतीने ट्रेंचिंग ग्राऊंडमध्ये साठलेला कचरा पसरविण्यात आला आणि त्यातील हानीकारक तत्त्व नष्ट व्हावे या दृष्टीने त्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या १३ लाख टन कचºयातून जवळपास ४ लाख टन प्लास्टिक वेगळे काढण्यात आले. प्लास्टिकसह, गत्ता, चामडे, धातूंचे तुकडे वेगळे करुन भंगारवाल्यांना विकण्यात आले.
कचºयाची टेकडी हटताच जवळपास १०० एकर जमीन रिकामी झाली. या जमिनीला समतल करून ९० एकर भूमीवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. कचºयाची समस्या सोडविण्यासाठी नियोजित रूपाने सुरू केलेल्या कामामुळे कचºयाची टेकडी आज छोट्या हिरव्यागार उपवनात रुपांतरित होत आहे.
>दिल्लीसह अनेक महानगरांमध्ये समस्या
देशाची राजधानी दिल्लीतच गाजीपूरसह विविध भागात कचºयाच्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. गाजीपूर येथील कचºयाची टेकडी ६५ मीटर उंच वाढली असून आणखी ८ मीटर वाढली तर कुतूबमीनारच्या उंचीपर्यंत पोहचेल. दुसरीकडे पंजाबमध्ये गेल्या १० वर्षाच्या प्रयत्नानंतरही कचºयाचे ढिगारे नष्ट करणे शक्य झाले नाही. या ढिगाºयामुळे भूजलही प्रदूषित झाले आहे.

Web Title: Due to the stubbornness of her, the park is doing it through the dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.