शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे बहुतांश वीज पुरवठा सुरळीत राखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:40 PM

मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला.

मुंबई : महापारेषणच्या कळवा येथील उपकेंद्रात झालेल्या मोठ्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र अथक मेहनत घेऊन विजेचा ताळमेळ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे भांडुप नागरी परिमंडलाअंतर्गत येणाऱ्या मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांना शनिवारी कोणत्याही व्यत्ययाविना अखंड वीज पुरवठा करण्यात आला. कळवा येथील उपकेंद्राच्या आगीमुळे अद्यापही परिस्थिती पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार आहे. यादरम्यान ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात तुरळक प्रमाणात व्यत्यय येऊ शकतो. अशा काळात महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात शुक्रवारी मध्यरात्री आग लागल्यामुळे उपकेंद्रातील यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. तसेच त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील ग्राहकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला होता. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा म्हणून महापारेषणच्या २२० केव्ही खारघर बोरीवली वाहिनी ही २२० केव्ही महापे वाहिनीस जोडण्यात आली आहे. तसेच महावितरणकडून वीज मागणी व पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा आटोकाट प्रयत्नामुळे काही तुरळक भाग वगळता ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यात महावितरण यशस्वी झाले आहे. मात्र, तरीही विजेची मागणी वाढल्यास यंत्रणेवर अधिकचा भार येऊन यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. अशा परीस्थितीत महावितरणने ग्राहकांच्या वीज पुरवठ्यात कमीत कमी व्यत्यय येईल याकरता प्रभावी नियोजन केले आहे. या काळात ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. 

टॅग्स :electricityवीज