शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

वळवाने मोडले कंबरडे भात भुईसपाट तर भुईमुगाला मोड साळाशे हेक्टरवरील काढणी खोळंबली भात, सूर्यफूल, भुईमुगाचे ३० टक्के उत्पन्न घटणार

By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST

राजाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राजाराम लोंढे/कोल्हापूर : गेले आठ दिवस रोज झोडपून काढत असलेल्या वळवाच्यापावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळी भात, सूर्यफूल, भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सोळाशे हेक्टरमधील पिकांची काढणी खोळंबली आहे. धुवाधार पावसाने काढणीला आलेले भात भुईसपाट झाले आहे, तर ढगाळ हवामान व पावसामुळे सूर्यफूल, भुईमुगाचे उत्पन्न ३० टक्के घटणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वळवाने फारच लवकर हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. गेल्यावर्षी २५ मेला पहिला वळीव पाऊस झाला होता. यावेळी एप्रिलमध्येच वळवाने हजेरी लावून त्यानंतर सातत्य ठेवल्याने शेतकर्‍यांची पंचाईत झाली आहे. गेल्यावर्षीच्या हवामानाच्या अंदाजानुसार शेतकर्‍याने उन्हाळी भात, सूर्यफूल व भुईमुगाची पेरणी केली होती. हातकणंगले व शिरोळ तालुका वगळता जिल्‘ात कमी-जास्त प्रमाणात उन्हाळी भात, सूर्यफूल, मका व भुईमूग घेतले जाते.
जानेवारी महिन्यात पेरणी झालेली पिके काढणीस आलेली आहेत. तर फेबु्रवारीमध्ये पेरलेले सूर्यफूल परिपक्वतेत आहे. गेले आठ-दहा दिवस असलेल्या ढगाळ हवामानामुळे परागीकरणाची गती काहीसी मंदावली आहे. परिणामी सूर्यफूल भरण्याची प्रक्रियाही कमी झाली आहे. काढणीस आलेल्या सूर्यफुलांचेही पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भुईमुगाच्या जाळीभोवती पाणी तुंबल्याने शेंगांना मोड येण्याचा धोका अधिक आहे. सध्या भुईमुगाची काढणी सुरू झाली आहे. आणखी आठ दिवसांत काढणीस गती येणार असून, असाच पाऊस राहिला, तर भुईमूग पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वच तालुक्यांत साधारणत: उन्हाळी भात हे नदीकाठच्या जमिनीत घेतले जाते. अगोदर पेरणी झालेल्या भाताच्या कापण्या सुरू झाल्या आहेत. रोज वळीव झोडपत असल्याने भाताची मळणी करताना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. काढणीनंतर भिजलेले भात उन्हात घालायचे म्हटले, तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भाताबरोबर पिंजरही खराब होऊ लागले आहे. तर वळवाच्या जोरदार तडाक्याने काढणीस आलेले भात अक्षरश: भुईसपाट झाले आहे. भातावर पाणी साचल्याने भात कापायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
वळवाचा रोज तडाका असल्याने साळाशे हेक्टरमधील काढणी खोळंबली आहे. त्याचबरोबर खरीप पेरणीच्या मशागतीची कामेही ठप्प झाली आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शेतीच्या कामकाजावर झालेला आहे.
चौकटी-
उसाला पोषक, भाजीपाल्याला मारक
वीजेच्या भारनियमनामुळे एप्रिल-मे महिन्यांत उसाला पाण्याचा फेरा वेळेत बसत नाही. परिणामी उसाची उंची खुंटते, हा पाऊस उसाला पोषक ठरत आहे. धुवाधार पावसाने शेतकर्‍यांचे एक-दोन पाणी देणे वाचले आहे. पण काढणीस आलेल्या पिकांसह भाजीपाल्याला हा पाऊस मारक ठरत आहे.
दुष्काळात तेरावा महिना!
यंदा बनावट सूर्यफूल बियाण्याने शेतकरी हैराण आहे. फुले अर्धवट भरल्याने उत्पन्नात घट येणार आहे. जी अर्धवट आहेत, ती काढणीसाठी आली असताना रोजच्या पावसाने त्याचीही नासाडी होऊ लागल्याने सूर्यफूल उत्पादक शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेच म्हणावे लागेल.
हंगाम लांबल्याचा फटका
साखर कारखान्यांचा हंगाम यंदा तब्बल एक महिन्याने पुढे गेला. परिणाम जानेवारीमधील पेरण्या फेबु्रवारीअखेरपर्यंत चालल्या. ही पिके मे महिन्याच्या अखेरीस काढणीस येणार आहेत. वळवाची अशीच चाल राहिली तर या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.
उन्हाळी पिकांचे क्षेत्र हेक्टरमध्ये असे -
सूर्यफूल - ६४४
भुईमूग - ७३०
भात - ३१७
मका - २१७
ज्वारी - ७५
------------------------------------------
कोट -
वळीव पावसाने अगोदर पेरणी झालेल्या सूर्यफूल, भुईमूग, भात पिकांचे नुकसान होत आहे. असाच पाऊस आणखी आठ-दहा दिवस राहिला, तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- सुरेश मगदूम (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)
गेले आठ दिवस पाऊस दमवत आहे. रोज झोडपून काढत असल्याने हातातोंडाला आलेली पिके काढायची की तशीच शिवारात ठेवायची, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे. या पावसाने भातासह सर्वच पिकांच्या उत्पन्नात किमान ३० टक्के घट होणार आहे.
- बाबूराव बापू खाडे (शेतकरी, सांगरुळ)