शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

९०० वर्षांच्या दुष्काळामुळे सिंधू संस्कृती लयास गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 23:41 IST

सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.

खडगपूर : सलग ९०० वर्षे पडलेल्या भीषण दुष्काळामुळे सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अस्ताला गेली, असा निष्कर्ष खडगपूर आयआयटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यासाअंती काढला आहे. त्यावेळी २०० वर्षे दुष्काळ पडला होता हा आजवरचा समजही यामुळे चुकीचा ठरला आहे.खडगपूर आयआयटीच्या भूगर्भशास्त्र व भूभौतिकी विभागातील संशोधकांनी केलेल्या या संशोधनाचा शोधनिबंध ‘एल्सविर क्वार्टर्ली इंटरनॅशनल जर्नल’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात याच महिन्यात प्रसिद्ध केला जाणार आहे.या अभ्यासात वैज्ञानिकांनी पाच हजार वर्षांच्या कालखंडातील पाऊसमानातील बदलांचा अभ्यास केला. सिंधू नदीसमुहातील नद्यांचा मुख्य जलस्रोतातूनच लेह-लडाखमधील त्सो मोरिरी सरोवरासही पाणी मिळते. आयआयटीच्या वैज्ञानिकांनी त्या भागातील पाऊसपाण्याच्या प्रमामाचाही पाच हजार वर्षांच्या कालखंडाचा अभ्यास केला आणि पाऊस केव्हा समाधानकारक झाला, केव्हा कमी झाला किंवा केव्हा अजिबात गायब झाला याचे काळ निश्चित केले. भूगर्भशास्त्र विभागातीलज्येष्ठ अध्यापक आणि या संशोधकांच्या चमूचे नेते डॉ.अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितले की, ख्रिस्तपूर्व २,३५० ते १,४५० (सुमारे ४,३५० वर्षांपूर्वी) या कालखंडात सिंधू संस्कृतीच्या प्रदेशात पाऊस खूपच कमी झाल्याने भाषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. (वृत्तसंस्था)रहिवाशांचे पूर्व तसेच दक्षिणेकडे स्थलांतरवायव्य हिमालयात पावसाने सुमारे ९०० वर्षे दडी मारल्याने सिंधू संस्कृती ज्या नद्यांच्या काठांवर विकसित झाली होती त्या पार आटून गेल्या. यामुळे या नगरांमध्ये एरवी कणखरपणे वास्तव्य करून राहिलेल्यांना नाईलाजाने जेथे पाऊसपाणी बरे होते अशा पूर्व व दक्षिणेकडे स्थलांतर करावे लागले.

टॅग्स :droughtदुष्काळ