दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला, व्हिडीओ कुटुंबीयांना पाठविला; बेळगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 12:50 IST2025-02-06T12:49:45+5:302025-02-06T12:50:59+5:30
दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद

दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला, व्हिडीओ कुटुंबीयांना पाठविला; बेळगावमधील घटना
बेळगाव : गोकाक येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या दाम्पत्यामध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून करून तो व्हिडीओ पत्नीच्या नातेवाइकांना पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मीराबाई जंगले, असे मृत महिलेचे नाव असून, बालाजी जंगले (रा. चांबूरदर, जि. यवतमाळ) असे संशयित पतीचे नाव आहे. ही घटना गोकाक येथील उप्परट्टी गावात घडली.
बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. यवतमाळ येथून ते ऊसतोडणीला आले होते. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर दारूच्या नशेत असणाऱ्या बालाजी यांनी मीराबाई यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. बालाजीने या घटनेचे चित्रण मोबाइलमध्ये करून पत्नीच्या नातेवाइकांना पाठविले. संशयिताची रवानगी गोकाक ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.