रात्री उशिरापर्यंत मित्राबरोबर फिरत होती म्हणून तरुणीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 11:29 IST2018-01-24T11:23:37+5:302018-01-24T11:29:08+5:30

पीडित तरुणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास आलोक राजपूत या तिच्या मित्रासह पेपर मार्केट भागात फेरफटका मारत होती. त्यावेळी आरोपी तिथे आला.

Drunk man beats, rapes woman for roaming 'late at night' with male friend | रात्री उशिरापर्यंत मित्राबरोबर फिरत होती म्हणून तरुणीवर केला बलात्कार

रात्री उशिरापर्यंत मित्राबरोबर फिरत होती म्हणून तरुणीवर केला बलात्कार

ठळक मुद्देआरोपी आरडाओरडा करुन दोघांना नैतिकता आणि सभ्यतेचे धडे देत होता. आरोपीने सापेरा बस्ती भागात रात्रीच्या अंधारात मला गाठल व मारहाण केली.

नवी दिल्ली - राजधानी दिल्ली महिलांसाठी अजिबात सुरक्षित नसून दिवसेंदिवस महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत आहे. गुरगावमध्ये विवाहित महिलेवर पती आणि दिरासमोर बलात्कार झाल्याची घटना ताजी असताना आता पूर्व दिल्लीत गाझीपूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली पण पीडित महिलेने रविवारी गाझीपूर पोलीस ठाण्यात बलात्कार आणि मारहाणीची तक्रार दाखल केली. 

पीडित तरुणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास आलोक राजपूत या तिच्या मित्रासह पेपर मार्केट भागात फेरफटका मारत होती. त्यावेळी आरोपी तिथे आला व रात्री उशिरा फिरण्याच्या मुद्यावरुन त्याने दोघांची कानउघडणी  केली. आरोपी आरडाओरडा करुन दोघांना नैतिकता आणि सभ्यतेचे धडे देत होता. चार लोक तिथे गोळा झाल्यामुळे अखेर दोघे वेगवेगळया मार्गाने निघून गेले. 

त्या माणसाने आम्हाला धमकावले व घरी परतण्यास सांगितले. त्याच्या भितीने मी आणि आलोक वेगवेगळया मार्गाने निघालो. आरोपीने सापेरा बस्ती भागात रात्रीच्या अंधारात मला गाठल व मारहाण केली असे पीडित तरुणीने सांगितले. आरोपी दारुच्या नशेत होता. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली व माझ्यावर बलात्कार केला असे पीडित तरुणी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

बलात्कारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. पीडित तरुणी घरी पोहोचल्यानंतर तिने घडला प्रकार आईला सांगितला. वैद्यकीय तपासणीतून तरुणीवर बलात्कार आणि मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376, 323, 354 डी आणि 506 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. 

Web Title: Drunk man beats, rapes woman for roaming 'late at night' with male friend