'नशा शराब मे होता तो'... महिला डान्सरसोबत भाजपा आमदाराचा डान्स व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 16:48 IST2018-12-05T16:46:18+5:302018-12-05T16:48:58+5:30
हिला डान्सरसोबत आमदारसाहेब शराबी चित्रपटातील गाण्यावर बेधुंद होऊन नाचत असल्याचे पाहून कार्यर्त्यांनाही जोश आला

'नशा शराब मे होता तो'... महिला डान्सरसोबत भाजपा आमदाराचा डान्स व्हायरल
लखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका भाजपा आमदाराने 'नशा खराब मे होता तो'... या गाण्यावर महिला डान्सरसोबत डान्स केला आहे. येथील रानीगंज विधानसभा क्षेत्रातून हे महाशय आमदार आहेत. अभयकुमार उर्फ धीरज ओझा असे यांचे नाव असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आमदार धीरज ओझा आपल्या कार्यकर्त्यांसह नाचण्यात दंग झाल्याचे दिसते. तर, महिला डान्सरसोबत आमदारसाहेब शराबी चित्रपटातील गाण्यावर बेधुंद होऊन नाचत असल्याचे पाहून कार्यर्त्यांनाही जोश आला असून तेही टाळ्या वाजवून दाद देत आहेत. एक कार्यकर्ता फुलांचा हार घेऊन इतरांचा उत्साह वाढवत आहे. तर दुसरा कार्यकर्ता आपल्या नेत्यासह महिला डान्सरसोबत डान्स करत आहे.
'नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये बताओ तो जरा...लोग कहते है मैं शराबी हूं...।' या गाण्यावर नाचताना काही कार्यकर्त्यांनी दारू पिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत होत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शुट करताना एका कार्यकर्त्याची नजर व्हिडीओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर पडली, त्यावेळी त्याने त्याच्याकडील मोबाईल हिसकाऊन घेण्याचा प्रयत्न केला.