ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 16:53 IST2025-05-05T16:52:56+5:302025-05-05T16:53:44+5:30
Accident In Near Taj Mahal: प्रेमाचं प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताजमहालाला दररोज जगभरातील हजारो पर्यटक भेट देत असतात. या ताजमहालाजवळच आज एक अत्यंत भयंकर घटना घडली. येथील पश्चिम दरवाजाजवळील पार्किंगमध्ये उभी असलेली कार ड्रायव्हरशिवायच मागच्या दिशेने धावू लागली. या कारखाली सापडून दोन पर्यटक जखमी झाले.

ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
प्रेमाचं प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताजमहालाला दररोज जगभरातील हजारो पर्यटक भेट देत असतात. या ताजमहालाजवळच आज एक अत्यंत भयंकर घटना घडली. येथील पश्चिम दरवाजाजवळील पार्किंगमध्ये उभी असलेली कार ड्रायव्हरशिवायच मागच्या दिशेने धावू लागली. या कारखाली सापडून दोन पर्यटक जखमी झाले. अखेरीस ही कार जावून एका दुकानावर आदळून थांबली. या दुर्घटनेत आणखी काही जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील परवाना असलेली ही काय हँडब्रेक न लावता उतारावर उभी करण्यात आली होती. ही कार अचानक मागच्या दिशेने वेगाने धावू लागली आणि एका दुकानावर जाऊन आदळली. ही कार दुकानाला धडकली तेव्हा तिथे अनेक पर्यटक उभे होते. त्यातील दोघेजण कारखाली चिरडून गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
या प्रकरणी ताजगंज पोलीस ठाण्यातील प्रभारी निरीक्षकांनी सांगितले की, ही कार पार्किंगमध्ये उभी होती, कदाचित सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मागच्या दिशेने ढकलली गेली. या कारखाली सापडल्याने दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.