ट्रेन थांबवून लोको पायलट दारू प्यायला गेला; पकडल्यावर म्हणतो, मी ट्रेनच आणली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 03:42 PM2022-05-05T15:42:35+5:302022-05-05T15:45:23+5:30

ट्रेन थांबवून दारू पिण्यासाठी गेला लोको पायलट; ट्रेन तासभर एकाच जागी, प्रवासी वैतागले

driver stopped the train to drink alcohol the passengers kept waiting | ट्रेन थांबवून लोको पायलट दारू प्यायला गेला; पकडल्यावर म्हणतो, मी ट्रेनच आणली नाही

ट्रेन थांबवून लोको पायलट दारू प्यायला गेला; पकडल्यावर म्हणतो, मी ट्रेनच आणली नाही

Next

पाटणा: ट्रेन थांबवून भज्या खरेदी करायला गेलेल्या लोको पायलटचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ट्रेन थांबवून चहा प्यायला गेलेल्या लोको पायलट चर्चेत आला. यानंतर आता एका लोको पायलटनं पुढचं पाऊल टाकलं आहे. ट्रेन मध्येच थांबवून लोको पायलट दारू प्यायला गेला. पकडला गेल्यावर लोको पायलट भलतीच उत्तरं देऊ लागला. बिहारच्या समस्तीपूरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. 

विशेष म्हणजे बिहारमध्ये दारूबंदी आहे. तरीही दारू सर्रास विकली जाते. ट्रेन थांबवून दारू प्यायला गेलेल्या लोको पायलटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोको पायलटच्या मद्यप्रेमामुळे ट्रेन तासभर एकाच जागी उभी होती. प्रवासी वैतागले. ट्रेनमध्ये असलेल्या एका दुसऱ्या चालकानं स्टेशन मास्तरांच्या परवानगीनं ट्रेन चालवली. दारू पिण्यास गेलेला चालक मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी डीआरएमनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

ट्रेन नंबर ०५२७८ समस्तीपूरहून सहरजाला जात होती. राजधानी एक्स्प्रेसच्या क्रॉसिंगमुळे ट्रेन हसनपूर रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. यादरम्यान सहायक लोको पायलट करणवीर यादव ट्रेनच्या इंजिनमधून गायब झाला. राजधानी एक्स्प्रेस निघून गेल्यावर पॅसेंजर ट्रेनला हिरवा सिग्नल मिळाला. मात्र ट्रेन बराच काळ जागची हलली नाही.

सहाय्यक स्टेशन मास्तरांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून ट्रेन न चालण्यामागचं कारण विचारलं. त्यावेळी चालक गायब झाल्याची माहिती समजली. तास उलटला तरी ट्रेन पुढे सरकत नसल्यानं प्रवासी संतापले. सहाय्यक लोको पायलटचा शोध सुरू झाला. मात्र बराच वेळ तो सापडला नाही.

बराच वेळानंतर लोको पायलट जीआरपी पोलिसांच्या हाती लागला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या लोको पायलटला धड उभंही राहता येत नव्हतं. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या खिशात दारूची अर्धी भरलेली बाटली सापडली. पोलिसांनी त्याला अटक केली. मी दारूच प्यायलो नाही आणि कोणतीही ट्रेन घेऊन आलो नसल्याचं उत्तर या लोको पायलटनं पोलिसांना दिलं.

Web Title: driver stopped the train to drink alcohol the passengers kept waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.