शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर आणि नर्सना घर सोडायला लावणाऱ्यांवर होणार कारवाई - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 18:00 IST

डीआरडीओने एन-95 मास्कची उपलब्धता वाढविण्यासाठीही स्थानिक उत्पादकांसोबत काम सुरू केले आहे

ठळक मुद्देयासंदर्भात जिलाधिकारी, महानगर पालिका आणि पोलिसांना देण्यात आले आहेत आदेशनिजामुद्दीनप्रकरणीही निश्चितपणे होणार कारवाईएन-95 मास्कची उपलब्धता वाढविण्यासाठी स्थानिक उत्पादकांसोबत सुरू केले काम

नवी दिल्ली - जे घरमालक डॉक्टर आणि नर्सेस यांना घर सोडण्यासाठी त्रास देत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असा आदेश दिल्ली सरकारने जिलाधिकारी, महानगर पालिका आणि पोलिसांना दिला आहे. महामारी रोग अधिनियमांतर्गत हा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय डीआरडीओनेही एन-95 मास्कची उपलब्धता वाढविण्यासाठीही स्थानिक उत्पादकांसोबत काम सुरू केले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्‍त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

परराष्ट्र मंत्रालय देशात आवश्यक वस्तूंची उपलब्धता वाढवण्यासाठी दक्षिण कोरिया, तुर्की आणि व्हियतनाममधील पुरवठादारांच्या संपर्कात आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.यावेळी दिल्‍लीतील निजामुद्दीन प्रकरणावर बोलताना, सर्वांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे, की ही चूक शोधण्याची वेळ नाही, मात्र, या प्रकरणात कारवाई निश्चितपणे होईल, असेही आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सहकार्य न मिळाल्याने वाढली कोरोना रुग्णांची संख्या -

लोकांचे हवे तसे सहकार्य मिळत नसल्याने कोरोना व्हायरसच्या प्रकरणांत वाढ होत आहे. कोरोनाचा सामना आपल्या सर्वांना सोबतीने करावा लागणार आहे. संपूर्ण देश एकत्रित येऊनच कोरोनाचा पराभव करू शकतो. कोरोना संदर्भातील प्रत्येक छोटी मोठी माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. गरीबांच्या आवश्यक गरजाही भागवल्या जात आहे, असेही लव अग्रवाल यावेळी म्हणाले.

देशभरात 123 लॅब्समध्ये सुरू आहे काम -

आयसीएमआरचे रमन गंगा खेडकर म्हणाले, आतापर्यंत आम्ही 42,788 सॅम्पलची तपासणी केली आहे. यापैकी 4,346 सॅम्पल्स सोमवारी टेस्ट करण्यात आले आहेत. देशात एकूण 123 लॅब्‍स यावर काम करत आहेत. सरकारने  49 लॅब्सनाही परवानगी दिली आहे. खासगी लॅबमध्ये सोमवारी 399 रुग्णांच्या सॅम्पल्सची तपासणी करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतdelhiदिल्लीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल