शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

खबरदार! डॉक्टरांवर हात उचलाल तर 10 वर्ष जेलची हवा खाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 08:03 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते.

नवी दिल्ली - कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर मारहाणीच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपाला इंडियन मेडिकल असोसिएशननेदेखील पाठिंबा दिला आहे. सोमवारी देशात आयएमएकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक ठिकाणी रुग्णसेवेचा बोजवारा उडाला होता. डॉक्टरांना सुरक्षा देण्यासाठी कायदा बनवावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

आयएमएने याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र लिहून डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी कडक कायदा बनवावा अशी मागणी केली आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनने वैद्यकीय सेवा सुरक्षा कायदा 2017 रोजी प्रस्तावित केला होता. त्यामध्ये डॉक्टरांना मारहाण केल्यास 10 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड अशाप्रकारचा प्रस्ताव देण्यात आला होता. तो कायदा पुन्हा एकदा कोलकात्याच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. सध्या आयएमएकडून सात वर्ष जेलची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने सोमवारी देशभरात डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद होते. शिवाय, रेडिओलॉजिस्ट संघटनांनी या बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. निवासी डॉक्टरांच्या मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांच्या अस्मि या संघटनांनीही काळ्या फिती बांधून आंदोलनात सहभाग घेतला. परिणामी, या बंदमुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांचा ओढा शासकीय आणि पालिका रुग्णालयांत वळल्याचे दिसून आले. या सर्व संघटनांनी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात केंद्रीय कायदा लागू करण्याची प्रमुख मागणी केली आहे.

कृतिशील धोरण राबवादेशभरातील रुग्णालयांत एकसारखी सुरक्षा व्यवस्था लागू करावी. वॉर्डमध्ये प्रवेशासाठी एसओपी (स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर) बनविले जावे. रुग्णालयांत सुरक्षा गार्डची संख्या वाढवून बंदूकधारी गार्ड तैनात करावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवावी. सीसीटीव्ही बसवावेत. रुग्णालयांत सुरक्षेसाठी हॉटलाइन अलार्म सिस्टम बसवावी. सुरक्षेची नियमित तपासणी करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. - डॉ. सुहास पिंगळे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्य

...त्यानंतर ठरणार पुढची भूमिकामंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यानंतर पश्चिम बंगाल येथे या हल्ल्याप्रकरणी जो निर्णय घेण्यात येईल, त्यानंतरच राज्यातील संघटना पुढची भूमिका जाहीर करतील.- डॉ. नीलिमा वैद्य-भामरे, सचिव, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सलटंट

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीयwest bengalपश्चिम बंगाल