Donald Trump's India Visit : An Indian search these things in Donald Trump's personal life on Google | Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च

Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च

नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत भारतीयांच्या मनात कुतुहल आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्यासाठी भारतीय नेटीझन्स प्रयत्नशील आहेत. डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी आणि मुलगीबाबत भारतीयांकडून  मोठ्या प्रमाणात सर्च केले जात आले. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत गुगलवर सर्च करण्यात येत असलेले हाकी प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत. 

१ - डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव काय? 
 डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव इवांका ट्रम्प आहे. इवांकासुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारताच्या दौऱ्यावर आली आहे. इव्हांकासोबत तिचे पती जेरेड कुशनरसुद्धा तिच्यासोबत आले आहे.  इवांका ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामध्ये सल्लागार आहे. इवांका ट्रम्प यापूर्वी २०१७ मध्ये भारतात आली होती. त्यावेळी तिने हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. 

२ - डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीचे नाव काय? 
डोनाल्ड ट्रम यांच्या पत्नीचे नाव मेलेनिया ट्रम्प आहे. मेलेनिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. मेलेनिया यांचा जन्म १९७० मध्ये स्लोव्हानियामध्ये झाला होता. त्यांनी मॉडेलिंगसुद्धा केले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया यांनी २००५ मध्ये विवाह केला होता. 

३ - इव्हांका यांचे वय किती आहे? 
इव्हांका ट्रम्प यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९८१ रोजी झाला आहे. त्यांच्या पतीचे नाव जेरेड कुशनर आहे. 

४ - POTUS काय आहे ?
POTUS या शब्दाचा संपूर्ण अर्थ President of the United States म्हणजेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असा होतो. 

 ५ - मेलेनिया ट्रम्प यांचे वय किती आहे ? 
डोनाल्ट ट्रम्प यांचा जन्म १९७० मध्ये झाला होता. त्या अमेरिकेच्या प्रथम महिला आहेत. त्यांचे वय ५० वर्षे आहे. 

 ६ - डोनाल्ड ट्रम्प यांचे वय किती? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म १४ जून १९४६ रोजी झाला होता. सध्या त्यांचे वय ७४ वर्षे आहे.  
 

English summary :
Donald Trump's India Visit : Some Indian netizens are trying to know about Donald Trump and his personal life.

Web Title: Donald Trump's India Visit : An Indian search these things in Donald Trump's personal life on Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.