Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:16 IST2025-08-12T14:16:02+5:302025-08-12T14:16:28+5:30
एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतापले आहेत, शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यांनी उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळत आहे.

Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक संतापले आहेत, शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून त्यांनी उच्छाद मांडल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक लहान मुलगा स्त्यावर खेळत होता. तेव्हा अचानक एक भटका कुत्रा तिथे आला आणि त्याने अचानक मुलावर हल्ला केला.
कुत्र्याने मुलाला जमिनीवर पाडलं, त्याचे लचके तोडले. मुलगा घाबरून मोठमोठ्याने ओरडू लागला, परंतु त्यावेळी जवळ कोणीही मोठी व्यक्ती नव्हती जी लगेचच त्याला मदत करू शकेल. सुदैवाने त्याच वेळी दोन जण बाईकवरून तेथून जात होते. त्यांनी ही घटना पाहिली आणि लगेच त्यांची बाईक थांबवली आणि मुलाकडे धावले. दोघांनी मिळून कुत्र्याचा पाठलाग केला आणि मुलाला त्याच्या तावडीतून सोडवलं. यामुळे मुलाचा जीव वाचला.
गजरौला में घर के बाहर खेल रहे किशोर पर आवारा कुत्ते ने बोला हमला, सीसीटीवी में कैद हुई घटना @dmamrohapic.twitter.com/PLoJzf0wLf
— Aaina Sach ka (@Aainasachka190) August 11, 2025
तरुण वेळीच आले नसते तर मुलासोबत भयंकर घडलं असतं. या हल्ल्यात मुलाला दुखापत झाली आहे आणि त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते, वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मुलाला धोका नाही. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक महानगरपालिका आणि प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि ते दररोज रस्त्यावरून जाणाऱ्यांवर, विशेषतः मुलांवर हल्ला करत आहेत. जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.