शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

'... म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:23 AM

इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत

ठळक मुद्देसद्यपरिस्थिती जेईई व नीट परीक्षा घेणे म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का? सरकारच्या हे लक्षात येत नाही का? असा प्रश्न स्वामींनी विचारला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एन्ट्रान्स एक्झाम पुढे ढकलण्याची मागणी जोर धरत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेसचे लोकसभेतील गटनेता अधीर रंजन चौधरी यांनी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली  होती. त्यानंतर, भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीचा सरकारला घरचा अहेर दिला आहे. सद्यपरिस्थितीच JEE आणि NEET परीक्षा घेणे उचित नसल्याचे स्वामींना सूचवले आहे. 

इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली होती. त्यानंतर, ममता बॅनर्जी यांनीही हीच मागणी लावून धरली. आता, सुब्रमण्यम स्वामी यांनीही या मुद्द्यावरुन सराकरला लक्ष्य केले आहे.   सद्यपरिस्थिती जेईई व नीट परीक्षा घेणे म्हणजे शहरातील श्रीमंत पालकांच्या मुलांची बाजू घेणे नाही का? सरकारच्या हे लक्षात येत नाही का? असा प्रश्न स्वामींनी विचारला आहे. गेल्या 5 महिन्यांपासून गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनमुळे परीक्षांच्या तयारीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला आहे. ना इंटरनेटची सुविधा, ना लायब्ररीला जाण्याची सोय. त्यामुळे, NEET अभ्यासही झाला नाही. पंतप्रधान नरेंद मोदी याबद्दल नक्कीच सहानुभूतीपूर्वक विचार करतील, असे ट्विटर सुब्रमण्यम स्वामींनी केले आहे.  

ममता बॅनर्जींची मागणी

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा नको, असे म्हणत सुरक्षित आणि निर्भय वातावरणात परीक्षा पार पडाव्या, असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच, सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या NEET आणि जेईई परीक्षाही पुढे ढकलाव्यात अशी मागणीही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.  

काँग्रेसचीही तीच मागणी

दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८examपरीक्षाBJPभाजपाprime ministerपंतप्रधान