शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

Tatkal ticket Booking: रेल्वेच्या तत्काळ तिकिट बुकिंगची ही पद्धत माहितीय का? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 8:47 AM

Train Tatkal ticket Booking : तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती.

नवी दिल्ली : अचानक काहीतरी प्रसंग आला किंवा काम निघाले आणि आयआरसीटीसीवर जाऊन रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटले की तिकडे कायमच हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले असतात. म्हणजेच वेटिंगचे. अशावेळी रेल्वेचे तत्काळ तिकीट बुक करावे लागते. सीझनमध्ये तर सर्रास तत्काळचाच आधार घ्यावा लागतो. 1997 पासून ही स्कीम सुरु आहे. तत्काळमध्ये स्लीपर, थर्ड एसी, सेकंड एसी किंवा एक्झिक्युटीव्ह क्लासची तिकिटे काढता येतात. परंतू हे तत्काळ तिकीट पेटीएमद्वारेही काढता येते. 

तत्काळ तिकिट बुक करण्यासाठी रेल्वेने एसी क्लाससाठी सकाळी 10 वाजता एसी क्लास आणि नॉन एसी स्लीपरसाठी ११ वाजताची वेळ दिली आहे. आधी ही वेळ एकच होती. हे तिकिट तुम्ही रेल्वे स्टेशन किंवा IRCTC च्या वेबाईटवर बुक करू शकता. तत्काळसाठी एका पीएनआरवर केवळ चार प्रवाशांचे तिकिट बुक करता येते. तिकिटांच्या काळ्याबाजारामुळे हे करावे लागले आहे. तरीही सॉफ्टवेअरचा वापर करून तिकिटांचा काळाबाजार केला जातो. असे अनेक प्रकार पकडण्यात आले आहेत. 

हे लक्षात ठेवा...तत्काळ तिकिट ट्रेनचा चार्ट तयार होईपर्यंत बुक करता येते. अनेकदा चार्ट तयार होईपर्यंत तिकिट वेटिंगवर दिसते आणि चार्ट तयार झाला की ते कन्फर्म होते. तर अनेकदा तिकिट वेटिंगवरच राहते. हे पैसे माघारी दिले जातात. कन्फर्म तत्काळ तिकिट रद्द केल्यास रेल्वे तुम्हाला कोणतेही पैसे देत नाही. तर वेटिंगचे तिकिट आपोआप रद्द होते आणि काही प्रमाणावर चार्ज आकारून रेल्वे पैसे परत करते. 

Paytm द्वारे तात्काळ तिकिट बुक करण्याची पद्धत...

  • पेटीएम अकाऊंट लॉगिन करा. तत्काळ तिकिटची रेल्वेची वेळ होऊन गेली की अर्ध्या तासाने पेटीएमद्वारे तत्काळ तिकिट बुक करता येते. एसी क्लास 10.30 आणि नॉन एसी क्लास 11.30 वाजताची वेळ आहे. 

 

  • बुक ट्रेन तिकिटवर क्लिक करा...
  • आता सोर्स म्हणजेच जिथून निघायचे आहे ते ठिकाण आणि डेस्टिनेशन म्हणजे जिथे पोहोचायचेय ते ठिकाण टाका. 
  • प्रवासाची तारीख निवडा. 
  • कोणत्या ट्रेनने प्रवास करायचा ते निवडा. 
  • Quota मध्ये जाऊन तत्काळ सिलेक्ट करा आणि बुक बटन क्लिक करा. 
  • प्रवाशांची संख्या भरा. 
  • तुम्हाला हवा असलेला बर्थ सिलेक्ट करा. 
  • पेमेंट गेटवेवर पोहोचल्यावर पैसे भरा. लगेचच तुमचे तिकिट बुक होईल.  
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेticketतिकिटPaytmपे-टीएम