विशिष्ट पक्षाचेच काम करा असे स्वयंसेवकांना सांगत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:53 IST2018-09-19T01:42:06+5:302018-09-19T06:53:54+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा

Do not tell the volunteers that they work for a particular party! | विशिष्ट पक्षाचेच काम करा असे स्वयंसेवकांना सांगत नाही!

विशिष्ट पक्षाचेच काम करा असे स्वयंसेवकांना सांगत नाही!

नवी दिल्ली : विशिष्ट पक्षाचेच काम करा असे संघस्वयंसेवकांना सांगितले जात नाही. मात्र देशहिताचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहा असा सल्ला त्यांना संघाकडून जरूर दिला जातो, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येथे आयोजिलेल्या तीन दिवसीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी केलेल्या भाषणात त्यांनी हे उद्गार काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपामधील अनेक नेते हे पूर्वी संघ स्वयंसेवक होते. त्यामुळे संघाच्या तालावर भाजपा नाचतो ही जनमानसात असलेली प्रतिमा खोडून काढण्याच्या दृष्टीने भागवत यांनी भाजपाचे नाव न घेता सांगितले की, एका विशिष्ट पक्षाच्या कारभारात संघ महत्त्वाची भूमिका बजावतो हा चुकीचा समज आहे.

Web Title: Do not tell the volunteers that they work for a particular party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.