शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'चिल्लर'मधला 'चिल' विसरू नका, शशी थरूर यांच्या ट्विटला मानुषी छिल्लरचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 21:16 IST

जग जिंकणारी मुलगी दुसऱ्यांच्या फुटकळ बोलण्याने निराश होणार नाही. 'चिल्लर'चा अर्थ सुट्टे पैसे असा असला तरी, 'चिल्लर'मध्ये 'चिल'चा देखील समावेश आहे, हे विसरू नका, असे सांगत मानुषीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे'चिल्लर'मध्ये असणारा 'चिल' विसरू नका'छिल्लर' ऐवजी 'चिल्लर' म्हणत उडवली होती खिल्ली माफी मागत नेटिझन्सना शांत राहण्याचा सल्ला

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर विश्वसुंदरीचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या मानुषी छिल्लरची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. तिने 'मिस वर्ल्ड'ची स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. मात्र, तिच्या आडनावावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भाजपवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. पण, मजेशीर टिप्पणी करायला गेलेल्या शशी थरूर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. याबद्दल शशी थरूर यांनी जाहीर माफी मागत नेटिझन्सना शांत राहण्याचा सल्ला दिला.मानुषी छिल्लरने आपल्या शैलीत शशी थरूर यांना उत्तर दिले आहे. तिने ट्विट करून म्हटले आहे की, जग जिंकणारी मुलगी दुसऱ्यांच्या फुटकळ बोलण्याने निराश होणार नाही. 'चिल्लर'चा अर्थ सुट्टे पैसे असा असला तरी, 'चिल्लर'मध्ये 'चिल'चा देखील समावेश आहे, हे विसरू नका, असे सांगत मानुषीने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, मानुषीच्या या 'चिल' म्हणजे कूल उत्तराची दखल घेत शशी थरूर यांनी तिच्या उमदेपणाचे कौतुक केले आणि पुन्हा एकवार तिची माफी मागितली. प्रत्येक भारतीयासारखा मलाही तुझा अभिमान आहे, असेही शशी थरूर म्हणाले. 

दरम्यान, शशी थरूर यांनी मानुषीच्या आडनावाला 'छिल्लर' ऐवजी 'चिल्लर' म्हणत तिची खिल्ली उडवली होती. 'छिल्लर' हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडले. मोदी सरकारने आमच्या काळात सुरू असलेले चलन बंद केले. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली, या आशयाचे ट्विट शशी थरूर यांनी केले होते. त्यानंतर ट्विटरकरांनी शशी थरूर यांच्यावर टीका केली होती. मानुषी छिल्लरने 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला आहे. तिची अशा प्रकारे खिल्ली उडवणे चूक आहे. तुम्हाला हे वर्तन शोभत नाही, असेही काही नेटिझन्सनी त्यांना सुनावले होते.

 

'मिस वर्ल्ड 2017' चा किताबभारताच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकला आहे.  चीनमध्ये मिस वर्ल्ड 2017चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. या स्पर्धेत दुस-या स्थानावर मिस मेक्सिको आणि तिस-या क्रमांकावर मिस इंग्लंडनं मान मिळवला आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.

टॅग्स :Shashi Thaoorशशी थरुर