ऑनलाइन टीम
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुंबई, दि. १८- अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यातील वादाने आता नवीन वळण घेतले असून नेस वाडिया यांचे वडिल नस्ली वाडिया यांना अंडरवर्ल्डकडून धमकी आली आहे. प्रीती झिंटाला त्रास देऊ नका. तिला त्रास दिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकी नस्ली वाडियांना देण्यात आली आहे.
प्रीती झिंटाने नेस वाडियांविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस तपास करत असून नेस वाडियांवर अटकेची तलवार लटकत आहे. मंगळवारी या प्रकरणाने नवीन वळण घेतले. नेस वाडिया यांचे वडिल व बाँबे डाईंगचे मालक नस्ली वाडिया यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकावले. 'मी अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारी बोलत असून अभिनेत्री प्रीती झिंटाला त्रास देऊ नका. तिला आता पुन्हा त्रास दिल्यास त्याचे वाईट परिणाम भोगण्यास तयार रहावे असेही फोन करणा-या व्यक्तीने धमकावले आहे. वाडियांना एसएमएसद्वारेही धमकी देण्यात आली आहे.
याप्रकरणी वाडिया समुहाच्या अधिका-यांनी मंगळवारी रात्री मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वाडियांना आलेल्या फोन नंबरचा तपास सुरु केला आहे.