शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 05:22 IST

भाजप श्रेष्ठींचा नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; गृहमंत्री अमित शाह स्वत: झाले सक्रिय

- संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यांत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने भाजपने मतदान वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यापासून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी भाजपने नेत्यांना सूचना केल्या आहेत. कमी मतदान झाल्यास नेत्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना कारवाईस तयार राहण्यासही सांगितले आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे भाजपची काळजी वाढली आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात अधिक मतदान झाले आहे. मात्र, भाजपच्या अंदाजानुसार तेही कमी आहे. गेल्या तीन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वत: राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून सूचना देत आहेत. मंगळवारच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी शाह यांनी लोकसभा प्रभारी, प्रदेश प्रभारी आणि संघटनांच्या नेत्यांना सर्व जागांवर मतदान वाढविण्याबाबत सूचना दिल्या. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व राष्ट्रीय सरचिटणीसही मतदानावर लक्ष ठेवून आहेत. 

लाभार्थ्यांचे १०० टक्के मतदान झालेच पाहिजे...वाढत्या आणि कडक उन्हात तसेही मतदान कमी होते. मात्र, प्रत्येक मतदान केंद्रावर पूर्वीपेक्षा ३७० अधिक मते कशी पडतील, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. केंद्रीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचे १००% मतदान झाले पाहिजे, असा प्रयत्न आहे. मग ती मोफत रेशन योजना असो की, प्रधानमंत्री आवास योजना, लाभार्थ्यांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी भाजपची टीम कार्यरत आहे.

राज्यात दिवसभर बैठकाnराज्यात मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा टक्का कोणत्याही परिस्थितीत वाढवा, असे निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ११ बैठकी घेऊन दिले. nएका मतदारसंघातील १ हजार बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि सुपर वॉरियर या ऑनलाईन  बैठकांना उपस्थित होते. पक्षाचे महाविजय २०२४ चे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर मतदान मोठ्या प्रमाणात झालेच पाहिजे, यासाठी कुठलीही कसर सोडू नका असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४