शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 10:23 IST

Lok Sabha Election 2024 : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत.

DK Shivakumar Slaps A Congress Worker : हावेरी : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यादरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार एका वादात अडकले आहेत. डीके शिवकुमार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला सर्वांसमोर थप्पड मारली. यासंबंधीचा व्हिडिओ भाजपाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावरून आता डीके शिवकुमार यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. 

दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते काँग्रेसच्या नगरसेवकाला थप्पड मारताना दिसत आहेत. भाजपाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये डीके शिवकुमार त्यांच्या शेजारी घोषणा देत असलेल्या एका व्यक्तीला थप्पड मारतात. त्यानंतर डीके शिवकुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्या व्यक्तीला मागे ढकलताना दिसत आहेत. 

भाजपाच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही घटना कर्नाटकातील हावेरीमधील धारवाडमधील सावनूर शहरातील आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी डीके शिवकुमार येथे आले होते. यावेळी लोक डीके शिवकुमार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत होते. डीके शिवकुमार गाडीतून खाली उतरताच स्थानिक नगरसेवक अलाउद्दीन मणियार यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे डीके शिवकुमार इतके नाराज झाले की, त्यांनी त्यांना जोरदार थप्पड मारली.

कोण आहेत डीके शिवकुमार?गेल्यावेळी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. या विजयाचे श्रेय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांना जाते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील प्रमुख चेहरा मानले जात होते. मात्र, नंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यांचा जन्म 15 मे 1962 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव दोड्डालहल्ली केम्पेगौडा शिवकुमार आहे. 

याचबरोबर, डीके शिवकुमार यांना कर्नाटकातील वोक्कालिगा जातीचा प्रमुख चेहरा मानले जाते. तसेच, राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी ते एक आहेत. डीके शिवकुमार आठ वेळा आमदार झाले आहेत आणि काँग्रेस त्यांच्याकडे आपला संकटमोचक म्हणून पाहते. डीके शिवकुमार यांनी त्यांच्या राजकीय कौशल्यामुळे काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला, त्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांचे वर्चस्व वाढले आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkarnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा