डीके शिवकुमार पुन्हा बनले 'संकटमोचक'! हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 09:29 AM2024-02-29T09:29:38+5:302024-02-29T09:31:21+5:30

डीके शिवकुमार हे कर्नाटक राजकारणातील मोठं नाव. काँग्रेस पक्षातील ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक राज्यातील काँग्रेस सरकार वाचवली. आधी कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि आता हिमाचल प्रदेश असो, डीके शिवकुमार यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे.

DK Shivakumar became a troublemaker again Congress government saved in Himachal Pradesh | डीके शिवकुमार पुन्हा बनले 'संकटमोचक'! हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार वाचवले

डीके शिवकुमार पुन्हा बनले 'संकटमोचक'! हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार वाचवले

डीके शिवकुमार हे कर्नाटक राजकारणातील मोठं नाव. काँग्रेस पक्षातील ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक राज्यातील काँग्रेस सरकार वाचवली. आधी कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि आता हिमाचल प्रदेश असो, डीके शिवकुमार यांनी पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे. डीके शिवकुमार हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 

काल दिवसभर हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू होत्या. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला मदत केली. त्यामुळे काँग्रेसचे अनेक आमदार फुटल्याची चर्चा सुरू होती. सरकार कोसळ्याच्या चर्चेला अखेर रात्री पूर्णविराम मिळाला. हिमाचल प्रदेशात अडचणीत असलेल्या काँग्रेस सरकारला कर्नाटकच्या डीके शिवकुमार यांनी वाचवल्याचे बोलले जाते. 

ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड शाहजहान शेख यांना अटक; बंगालमध्ये पहाटेच झाली कारवाई

हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आमदारांचे निलंबन केल्याने काँग्रेसचे हे संकट टळले असले तरी यामागील रणनीती कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांची असल्याचे मानले जात आहे. विक्रमादित्य सिंह यांचा राजीनामा न स्विकारणे आणि त्यांची मवाळ वृत्ती हाही याच प्रयत्नांचा एक भाग आहे.यापूर्वीही त्यांनी अनेक प्रसंगी काँग्रेसला अडचणीतून सोडवले.

राज्यसभा निवडणुकीवेळी हिमाचल मधील काँग्रेस सरकार अडचणीत सापडले, यावेळी सरकार वाचवण्यासाठी पहिलं नाव डीके शिवकुमार यांचं नाव पुढं आलं.हिमाचलमध्ये क्रॉस व्होटिंगमुळे पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव होताच काँग्रेसने पुढचे संकट सरकारवर असल्याचे लक्षात आले, भाजपनेही पूर्ण तयारी केली होती आणि सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली होती. यावेळी हिमाचल काँग्रेसची बाजू  डीके शिवकुमार यांनी हातात घेतली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनाही निरीक्षक बनवले आणि राज्याचे प्रभारी राजीव शुक्लाही हिमाचलमध्ये पोहोचले. काँग्रेस आमदारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी निरीक्षकांवर होती, मात्र त्यासाठी वेळ हवा होता, जो आता भाजप आमदारांच्या हकालपट्टीने मिळाला आहे.

बुधवारी विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने हिमाचल काँग्रेसची स्थिती आणखी बिकट झाली. दिवसभर वादविवाद केल्यानंतर संध्याकाळी त्यांनी निर्णय बदलला. सीएम सखू यांनी त्यांचा राजीनामा नाकारला आणि त्यांना आपला लहान भाऊ म्हटले, तेव्हा विक्रमादित्य सिंग यांनीही आपण दबाव निर्माण करणार नसल्याचे सांगितले. हिमाचलमध्ये सुखू सरकार सुरक्षित असल्याची घोषणाही त्यांनी केली. विक्रमादित्य सिंह यांचे हे पाऊल काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलचा भाग मानले जात आहे. हे नुकसान नियंत्रित करण्यासाठी काँग्रेसने डीके शिवकुमार, हुडा आणि राजीव शुक्ला यांची नियुक्ती केली होती. एक दिवस आधी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारानेही सखू यांची माफी मागितल्याचे बोलले जात आहे.

डीके शिवकुमार काँग्रेसला अडचणीतून बाहेर काढले

काँग्रेस पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यात डीके शिवकुमार प्रत्येक वेळी यशस्वी ठरले आहेत. २०१८ मध्ये  कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी आमदारांची गरज होती, तेव्हा शिवकुमार यांनी काँग्रेसच्या एकाही आमदाराला पक्षांतर करू दिले नाही.

कर्नाटकात भाजप आमदाराने काँग्रेसला केले मतदान

राज्यसभा निवडणुकीत देशभरातील काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून भाजपला मतदान केले, पण कर्नाटकात उलट परिस्थिती होती. तेथे भाजपचे आमदार एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. सोमशेखर हे बेंगळुरूमधील यशवंतपूरचे आमदार आहेत. 

Web Title: DK Shivakumar became a troublemaker again Congress government saved in Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.