DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 16:38 IST2025-12-23T16:35:45+5:302025-12-23T16:38:01+5:30
सरपंच कुटुंबातील सदस्य फतेला यांनी सांगितले की, कुटुंबाने याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
ज्या घरातून वाजत-गाजत वरात निघणार होती, त्याच घरावर नवरदेवाची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. ही हृदयद्रावक घटना दिल्लीजवळील नूंह येथील एका गावात घडली आहे. लग्नाच्या काही तास आधीच नवरदेवाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही धक्कादायक घटना 'डीजे' वाजवण्यावरून घडल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकाचे रविवारी लग्न होते. शनिवारी रात्री लग्नाच्या तयारीसाठी त्याने डीजे आणला होता. मात्र, गावातील काही लोकांनी 'डीजे' ही सामाजिक वाईट गोष्ट असल्याचे म्हणत, वाजवण्यास विरोध केला. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर ग्रामस्थांनी केवळ एका तासाची परवांनगी दिली. दरम्यान नवरदेवाला मेहंदी लावण्यात आली. यानंतर डीजे बंद झाला. पण नवरदेवाला अधिक वेळ डीजे वाजवायचा होता, पण परवानगी मिळू शकली नाही.
रविवारी सकाळी नवरदेव घराबाहेर पडला आणि काही वेळाने गावाबाहेरील एका विजेच्या खांब्याला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने घरातील आनंदाचे रुपांतर क्षणात दुःखात झाले. सरपंच कुटुंबातील सदस्य फतेला यांनी सांगितले की, कुटुंबाने याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.