ग्रा.प.निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
नागपूर : मे ते आॉगस्ट दरम्यान होणाऱ्या जिल्ातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. मार्चपर्यंत ही यादी प्रकाशित करायची आहे.
ग्रा.प.निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या
नागपूर : मे ते आॉगस्ट दरम्यान होणाऱ्या जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. मार्चपर्यंत ही यादी प्रकाशित करायची आहे.राज्यातील नागपूरसह १३ जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील १२९ ग्राम पंचायतींचा समावेश आहे. या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून त्यासाठी त्याच धर्तीवर मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरून ती संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रभागानुसार विभाजित करायची आहे. त्या संदर्भातील वेळापत्रकही आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीला प्रभाग निहाय यादी प्रकाशित करायची आहे. ५ मार्चपर्यंत त्यावर आक्षेप मागवायचे असून १४ मार्चला अंतिम यादी प्रकाशित करायची आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेच्या संदर्भात आक्षेप मागवून त्यावर सुनावणी पूर्ण केली आहे. प्रशासनाकडे एकूण १५४ आक्षेप आले होते. त्यापैकी १४ ग्राह्य धरण्यात आले होते. (प्रतिनिधी)