शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात दीड लाखाचा गुटखा जप्त शहरातील पानटपर्‍या लक्ष्य : अन्नसुरक्षा विभागाची कारवाई

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता शहरातील पानटपर्‍यांवर लक्ष केंद्रित केले असून, एकाच वेळी धाडी टाकून गुटखा जप्त करण्यात आला. धडक कारवाईत एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा सापडला.

सोलापूर: अन्न व औषध प्रशासन विभागाने आता शहरातील पानटपर्‍यांवर लक्ष केंद्रित केले असून, एकाच वेळी धाडी टाकून गुटखा जप्त करण्यात आला. धडक कारवाईत एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा सापडला.
मागील दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल तपासणी, गुटखा जप्ती तसेच भेसळयुक्त दूध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. यामध्ये अस्वच्छ हॉटेलचालकांवर कारवाई केली जात आहे. शेजारच्या राज्यातून विक्रीसाठी येणारा गुटखाही मोठय़ा प्रमाणावर पकडला आहे. आता तर पानटपर्‍यांमध्ये राजरोसपणे विक्री सुरू असलेल्या गुटख्यावर धाडी टाकल्या आहेत. सोलापूर शहरातील 22 पानविक्रीच्या टपर्‍यांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला गुटखा जप्त करण्यात आला. डोंगरे पानशॉप नवीपेठ, चाचा पानशॉप किडवाई चौक, ओम जनरल स्टोअर्स विजापूर रोड, समीर किराणा सिद्धेश्वर पेठ, अजीज पानशॉप सिद्धेश्वर पेठ, तांबोळी पानशॉपमधला मारुती, सादिक पान सिद्धेश्वर पेठ, धानेश्वरी पानशॉप गुरुवार पेठ, महादेवी पानशॉप मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पानशॉप जुळे सोलापूर, अमृततुल्य पानशॉप शिवाजी चौक, नायब पानशॉप पेंटर चौक, मुस्कान पानशॉप सिद्धेश्वर पेठ, तांबोळी पानशॉपमधला मारुती, इंडिया पानशॉप सात रस्ता, वैष्णवी पानशॉप जुळे सोलापूर, अन्सारी पानशॉप, लोकप्रिया पानशॉप जुळे सोलापूर, बंदगी पानशॉप सिद्धेश्वर पेठ, स्वामी सर्मथ पानशॉप जुळे सोलापूर या ठिकाणी धाडी टाकून विक्रीसाठी ठेवलेला एक लाख 54 हजार 134 रुपयांचा गुटखा जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे, सुरेश तोरेम, रेणुका पाटील(सर्व सोलापूर), गणपतराव कोकणे, महिंद्र पाटील (कोल्हापूर), इम्रान हवालदार,उदय लोहकरे(सातारा), विजय उनवणे, सचिन आढाव(पुणे), राहुल खंडागळे, रोहन शहा (सांगली) आदींनी ही कारवाई केली. शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चौकट
बाहेरचे अधिकारी मागविले
शहर व जिल्?ातील पानटपर्‍यांवर मोठय़ा प्रमाणावर राजरोसपणे गुटखा विक्री केली जात असला तरी अन्न सुरक्षा अधिकार्‍यांची संख्या कमी असल्याने कारवाईची अडचण आहे. ही बाब लक्षात घेऊन धाडी टाकण्यासाठी शेजारच्या जिल्?ातील अन्न सुरक्षा अधिकार्‍यांना बोलावले होते. यामुळे एकाच वेळी 22 ठिकाणी धाडी टाकता आल्याचे सांगण्यात आले.
कोट
गुटखा व अन्य भेसळयुक्त ठिकाणी धाडी टाकण्यासाठी यापुढेही शेजारच्या जिल्?ातून अन्न सुरक्षा अधिकारी बोलावले जातील. शासनाने बंदी घातलेला गुटखा साठा जप्त केला जाईल.
किशोर गोरे
सहायक आयुक्त(अन्न )