शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या प्रबोधनासाठी जिल्हा प्रशासन सरसावले शेतकरी सबलीकरण मोहीमेची व्युहरचना: सुरु करणार फ्री हेल्पलाईन, गावागावात स्वयंसेवी संस्थांमार्फत प्रबोधन, देणार शपथा

By admin | Updated: December 14, 2014 00:07 IST

लातूर: जिल्‘ातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर गंभीर झालेल्या जिल्हा प्रशासनाने शेतकरी सबलीकरणाच्या मोहीमेला गती दिली आहे. यादृष्टीने शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्युहरचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सहकार, कृषी, दुग्ध, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी सबलीकरण मोहीमेच्या व्युहरचनेवर चर्चा करण्यात आली.

लातूर: जिल्‘ातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर गंभीर झालेल्या जिल्हा प्रशासनाने शेतकरी सबलीकरणाच्या मोहीमेला गती दिली आहे. यादृष्टीने शुक्रवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्युहरचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. सहकार, कृषी, दुग्ध, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी सबलीकरण मोहीमेच्या व्युहरचनेवर चर्चा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्‘ात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे. मागच्या महिन्यात दहाहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याने जिल्‘ात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्येमागची मानसशास्त्रीय कारणे आणि उपाय तर पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी शेतकर्‍यांपुढील समस्या आणि उपाय यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. तर जिल्हा कृषी अधिकारी टी. एस. मोटे, जिल्हा उपनिबंधक घोलकर, श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या मकरंद जाधव आणि ॲड. गोमारे, आरटीआय कार्यकर्ते लक्ष्मण वंगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन भराटे आदींनी आपली मते मांडली. यावरुन शेतकरी आत्महत्येविरोधात जागर करण्यासाठी शेतकरी सबलीकरण मोहीमेची संकल्पना पुढे आली. या बैठकीला पोलिस अधिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, उपजिल्हाधिकारी गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वभंर मुळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. मोफत हेल्पलाईनशेतकर्‍यांना आपले मन मोकळे करता यावे, यासाठी जिल्हा प्रशासन एक स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करेल. यात कामाच्या वेळा वाटून घेतलेले समुपदेशक आलेल्या दूरध्वनीवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतील. स्वयंसेवी संस्थामार्फत गावा-गावात प्रबोधनाचा जागर येत्या आठवडाभरात शहरातील स्वयंसेवी संस्था, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी, एनसीसीचे कमांडर यांची एक विशेष बैठक जिल्हा नियोजन सभागृहात बोलाविण्यात येईल. यात इच्छुकांना दुष्काळाने होरपळणार्‍या गावांचे प्रत्येकी चार पाच गावाप्रमाणे वाटप करण्यात येईल. त्या संस्थांच्या प्रमुखांना मानसोपचार तज्ज्ञ समुपदेश करण्याच्या पध्दतीचे प्रशिक्षण देतील. मग हे प्रतिनिधी गावा-गावात शेतकर्‍यांचे प्रबोधन आणि समुपदेशन करतील. शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन शेतकर्‍यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च सोपा व्हावा म्हणून खास शेतकर्‍यांच्या उपवर पाल्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याला प्रोत्साहन देण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीसाठी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी महसूलस अन्य विभागाच्या कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन देण्याबाबत विचारविनीमय सुरू असून या वेतन शेतकर्‍यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांवर खर्च करण्यात येईल. मनरेगा व जलसंधारणाची कामे वाढविणारदुष्काळी परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी जिल्‘ात मनरेगा व जलसंधारणाची कामे वाढविण्यात येतील. या कामातून गावा-गावात रोजगार उपलब्ध करुन हाताला काम उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. जलसंधारणासाठीही स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येईल. ग्रामदिन, ग्रामसभेला शपथग्रहण गावात ग्रामदिनी आणि ग्रामसभेदिनी शेतकर्‍यांना आत्महत्या हद्दपार करण्याची शपथ देण्यात येईल.