शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

चिराग पासवान आणि पशुपती पारस गटात वाद, निवडणूक आयोगाने लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह गोठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2021 6:05 PM

Lok Janshakti Party News: केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीच्या दोन गटात सुरू असलेला वाद सुटेपर्यंत लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह फ्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीच्या दोन गटात सुरू असलेला वाद सुटेपर्यंत लोकजनशक्ती पार्टीचे निवडणूक चिन्ह फ्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Lok Janshakti Party) निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आधी सांगितले होते की, याबाबतचा निर्णय हा ४ ऑक्टोबरपर्यंत घेतला जाईल. हा निर्णय शनिवार आणि सोमवारच्या दरम्यान, होईल. बिहारमधील दोन विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसाठी नामांकनाची प्रक्रिया सुरू आहे.  (Dispute between Chirag Paswan and Pashupati Paras group, the Election Commission freeze the election symbol of Lok Janshakti Party)

या प्रकरणी निवडणूक आयोग तीन पर्यायांवर विचार करत होता. १ अंतिम निर्णय घेईपर्यंत पक्षाचे निवडणूक चिन्ह अंतरिम आदेशापर्यंत फ्रीज करणे आणि पक्षाच्या दोन गटांना वेगवेगळ्या चिन्हांसह पोटनिवडणूक लढण्याची परवानगी देणे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या गटाकडे निवडणूक चिन्ह कायम ठेवणे किंवा पशुपती पारस यांच्या गटाला लोजपाचे पार्टि सिंबॉल देणे.

दरम्यान, चिराग पासवान यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचा दौरा केला होता. तसेच पक्षाचे निवडणूक चिन्ह त्यांच्या पक्षाकडे कायम राहावे, अशी विनंती केली होती. लोकजनशक्ती पार्टीच्या एका गटाचे नेतृत्व पक्षाध्यक्ष चिराग पासवान करत आहेत. तर पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व त्यांचे काका आणि केंद्रीय कॅबिनेटमंत्री पशुपती पारस करत आहेत. 

लोकजनशक्ती पार्टीमध्ये हे संकट यावर्षी जून महिन्यात सुरू झाले होते. तेव्हा पाच खासदार पासवान यांचा गट सोडून पारस यांच्या गटात गेले होते. त्यानंतर पारस यांनी स्वत: पाटणामध्ये स्वत:ला पक्षाचा अध्यक्ष घोषित केले होते.  

टॅग्स :Lok Janshakti Partyलोक जनशक्ती पार्टीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग