पाटात बुडालेल्या त्या बालकांचा शोध सुरूच

By admin | Published: May 8, 2014 05:52 PM2014-05-08T17:52:15+5:302014-05-08T17:52:15+5:30

विडी कामगार येथिल घटना :

The discovery of those children who were drowning in the stomach continued | पाटात बुडालेल्या त्या बालकांचा शोध सुरूच

पाटात बुडालेल्या त्या बालकांचा शोध सुरूच

Next
डी कामगार येथिल घटना :

पंचवटी : सायंकाळच्या सुमाराला पाटात आंघोळीसाठी गेलेले विडीकामगार नगर येथिल दोघे लहान मुले पाटात बुडाल्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली असुन आज दुसर्‍या दिवशी या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
पाटाला पाणी सोडल्याने विडीकामगार नगर परिसरात राहणारे प्रणव मधुकर खेलूकर (८) व योगेश बाळकृष्ण मावळे (११) असे दोघे जण काल बुधवारी सायंकाळी पाच वाजता आदर्श शाळेजवळून वाहणार्‍या पाण्याच्या पाटात आंघोळीसाठी गेले होते. मात्र सायंकाळ झाल्यानंतर दोघेही घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबियांनी बालक पाण्यात बुडाल्याबाबत पोलीसांना माहीती दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांनी स्वत: घटनास्थळी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन अग्निशामक दलाला दूरध्वनीवरून माहीती कळविली होती त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र विजपुरवठा खंडीत झाल्याने त्यातच पावसाच्या सरी बरसत असल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण झाला होता. गुरूवारी सकाळी पुन्हा पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या पाटात शोध मोहीम सुरू केली होती मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत कोणाचाही मृतदेह हाती लागला नसल्याने मुले पाण्यात बुडाली की कोठे गेली याबाबत स्पष्ठोक्ती होऊ शकली नाही. (वार्ताहर)

इन्फो बॉक्स
पाटाने घेतले सहा बळी
दर महिन्याला पाटाला पाणी सोडले जात असल्याने अनेक तरूण तसेच बालगोपाळ पाण्याच्या पाटात आंघोळीसाठी गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपुर्वी पाटाला पाणी सोडलेले असल्याने बालगोपाळांची गर्दी वाढतच आहे. वेगाने पाणी वाहणार्‍या पाटात खोलीचा अंदाज येत नसल्याने याच पाण्याच्या पाटात आतापर्यंत पाच ते सहा जणांचे बळी गेल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. मखमलाबाद, वज्रेश्वरी तसेच आडगाव हद्दीतून वाहणार्‍या पाण्याच्या पाटात या घटना घडल्या आहेत.

Web Title: The discovery of those children who were drowning in the stomach continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.