शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडची माहिती उघड; 17 वर्षीय रशियन मुलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 12:22 PM

मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे.ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही.

मॉस्को, दि. 1- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. ऐकुन सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पण या गेमच्या मागील मास्टरमाईंड एक 17 वर्षाची रशियन मुलगी आहे. रशियात राहणाऱ्या या 17 वर्षाच्या मुलीवर अनेक मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ही मुलगी नेमकी कोण आहे ?याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. डेअली मिररने हे वृत्त दिलं आहे.  पोलिसांच्या मते, ही मुलगी खेळाच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना तिने दिलेला आदेश ऐकला नाही,तर घरातील इतर व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देते. या गेममधील पीडित मुलांना ब्लेडच्या सहाय्याने स्वतःवर वार करायला, भितीदायक सिनेमे बघायला तसंच अर्ध्या रात्रीत उठायचे टास्क दिले जातात. गेम खेळणाऱ्या मुलाला नुकसान पोहचविण्याचा या मागील हेतू असतो.

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेली मुलगी ही सुसाइड गेम ग्रुपची अॅडमीन होती. ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकलेल्या मुलांना ती धमक्या द्यायची. तिने मुलांना दिलेला आत्महत्या करण्याता आदेश त्यांनी ऐकला नाही, तर तुमच्या आई-वडील, भाऊ-बहिणीला मारून टाकायची धमकी ती मुलगी द्यायची. रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, ही मुलगी पीडित मुलाला 50 टक्के टास्क देते, ज्याचा उद्देश मुलांना मानसिक त्रास देण्याचा असायचा. आणि खेळाच्या शेवटच्या टास्कमध्ये त्यांना आत्महत्या करायला लावण्याचा असायचा. 

ही मुलगी ‘डेथ ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेनं म्हटलं आहे. ती स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळाडू होती. तिने आत्महत्येकडे नेणारं आव्हान पूर्ण केलं नाही. त्याऐवजी ती त्या खेळाची अ‍ॅडमिन बनली. या ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची, अशी माहिती समोर आली आहे.

याआधी या जीवघेण्या 'ब्लू व्हेल चॅलेंज'मागे रशियातील तरूण असल्याची माहिती'ब्ल्यू व्हेल' या खतरनाक गेमचा रशियातील सायबेरिया प्रांतातील एका तरुणानं शोध लावला. फिलिप ब्युडेकिन नावाच्या 22 वर्षीय तरुणानं 'ब्ल्यू व्हेल' चॅलेंजची सुरुवात केली.  तरुणांना आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहन केल्यामुळे फिलिप गेल्या 3 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मे महिन्यात फिलिपनं सेंट पीटर्सबर्ग न्यूजला मुलाखत दिली होती. यावेळी जाणूनबुजून तरुणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले का?, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान फिलिपला विचारण्यात आला. यावेळी त्यानं ''हो. मी खरंच असेच केले. गोंधळून जाऊ नका तुम्हाला सर्व समजेल. प्रत्येकाला समजले'', अशी धक्कादायक कबुली त्यानं दिली. लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यामागे फिलिपनं निरर्थक व हादरवणारं असं कारण दिलं. त्याचं असं म्हणणं होतं की, ''काही मनुष्य आहेत आणि काही केवळ जैविक कचरा. जी लोकं समाजासाठी कोणत्याही प्रकारे कामी येत नाहीत. जे केवळ समाजाला नुकसान पोहोचवत आहेत किंवा पोहोचवतील.  अशा लोकांना आपल्या समाजातून मी मुक्त करत होतो.''  

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेलSuicideआत्महत्या