शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

वरवट येथे प्रवेश दिंडी

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

मनाठा : मनाठा केंद्रांतर्गत वरवट येथे जि़प़ शाळेत उत्साहपूर्वक शाळा शुभारंभ दिन साजरा करण्यात आला़

मनाठा : मनाठा केंद्रांतर्गत वरवट येथे जि़प़ शाळेत उत्साहपूर्वक शाळा शुभारंभ दिन साजरा करण्यात आला़
सकाळी पालक सभा घेण्यात आल्या़ त्यानंतर ढोलताशांच्या गजरात गावातून प्रवेश दिंडी काढण्यात आली़ पहिल्याच दिवशी २५ मुलामुलींना इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात आला़ शाळेत समारंभपूर्वक नवागतांचे फुल देवून स्वागत करण्यात आले़ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पुस्तके देण्यात आली़ दुपारी सर्व बालकांना मिष्ठान्न देवून नवीन शैक्षणिक वर्षाची गोड सुरुवात करण्यात आली़ कार्यक्रमास शा़व्य़स़ अध्यक्ष पुंडलिक कुंभकर्ण, उपसरपंच विश्वनाथराव सूर्यवंशी, लक्ष्मणराव खुपसे, ग्रामसेवक एस़एऩचंदेल, शेख हनीफशाह आदींची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जोशी व शिक्षक एस़एस़ वाकोडे, एम़एसग़ोपनर, बी़एऩलोमटे, ऋषिकेश जयस्वाल यांनी प्रयत्न केले़ गंगाधर शक्कीरगे व बळवंत शक्कीरगे यांनी सहकार्य केले़

प्रवेश पंधरवाड्यानिमित्त कार्यशाळा
हिमायतनगर : तालुक्यातील सरपंच, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य यांची प्रवेश पंधरवडा कार्यशाळा गटशिक्षण कार्यालयाच्या वतीने जि़प़ शाळा सभागृहात पार पडली़
अध्यक्षस्थानी पं़स़ सभापती आडेलाबाई हातमोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती लक्ष्मीबाई भवरे, पंडितराव रावते, बालाजी राठोड, अ़मन्नानभाई, बाबुराव कदम (सरपंच), गटशिक्षणाधिकारी सुरदुजे, शि़वि़अ़ संगपवार, गटसमन्वयक डांगे, ए़आऱअनगुलवार उपस्थित होते़ प्रास्ताविक शि़वि़अ़ संगपवार यांनी केले़ गटशिक्षणाधिकारी सुरदुजे यांनी वर्षभराच्या कार्याचा आढावा घेतला़ बालाजी राठोड यांनी मार्गदर्शन केले़ गटसमन्वयक डांगे यांनी आभार मानले़

पेरणीस सुरुवात
हिमायतनगर : तालुक्यात गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने सर्वत्र पेरण्या सुरू झाल्या आहेत़ १५ जून रोजी ४ च्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत झाला़ शेतकर्‍यांची ५० टक्के पेरणी संपली असून उर्वरित शेतकरी बियाणे घेण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत़