दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:42 IST2025-04-17T13:41:23+5:302025-04-17T13:42:18+5:30
Law Commission Chairperson: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित २३व्या विधी आयोगाच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले.

दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड
नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची २३व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली, तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य नेमण्यात आले आहे.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बहुप्रतीक्षित २३व्या विधी आयोगाच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केले.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन आणि वाराणसी हिंदू विद्यापीठाचे प्रोफेसर डी. पी. वर्मा यांची पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
२३व्या आयोगाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे. २२व्या विधी आयोगात अध्यक्षांसह सहा सदस्य होते. परंतु, २३व्या आयोगात अध्यक्षांसह केवळ तीन सदस्य आहेत ही विशेष बाब आहे.
घटाटे होते १७व्या विधी आयोगाचे सदस्य
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता डॉ. एन. एम. घटाटे यांची १७व्या विधि आयोगाच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. घटाटे १६व्या आयोगातही सदस्य होते.
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब अशी की, तब्बल २२ वर्षांनंतर विधि आयोगात सदस्य म्हणून राज्यातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे.
लंडनच्या स्कूल आफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि कॉर्पोरेट कायद्यांमध्ये एलएलएम पदवी मिळविणारे पुण्याचे ज्येष्ठ अधिवक्ता हितेश जैन यांना सदस्य नेमण्यात आले आहे.
ते ज्येष्ठ अधिवक्ता एस. के. जैन यांचे चिरंजीव होय. ३० वर्षांच्या कार्यकाळात हितेश जैन यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे खटले लढविले आहेत.