मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:06 PM2020-03-14T12:06:47+5:302020-03-14T12:07:22+5:30

राज्याचे संसदीय कार्यमंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बजेट सत्र पुढं ढकलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून विनंती केली आहे.

digvijay singh suspects they are infected with coronavirus | मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा

मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा दिग्विजय सिंह यांचा दावा

googlenewsNext

नवी दिल्ली - मध्यप्रदेशात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीनंतर  भारतीय जनता पक्ष राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे काँग्रेस देखील हार मानायला तयार नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शुक्रवारी राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेऊन राज्यातील स्थितीवर चर्चा केली.  राजीनामा देऊन गायब झालेले सर्व आमदार शुक्रवारी परतणार असा अंदाज व्यक्त कऱण्यात येत होता. मात्र ते आमदार परतले नाही. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसनेतेदिग्विजय सिंह यांनी दावा केला की, त्या आमदारांना कोरोना व्हायरसची लागण झाली असावी.

बंडखोर आमदार शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतील असा अंदाज होता. मात्र हे आमदार परतले नसल्याने मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. काँग्रेसनेते दिग्विजय सिंह म्हणाले की, बंडखोर आमदारांना बंगळुरू येथे कोरोना व्हायरसची लागण झाली. त्यामुळे या आमदारांची बंगळुरू येथेच तपासणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कमलनाथ यांनी राज्यपालांच्या भेटीत सांगितले की, भाजपकडून आमदारांना कैद करण्यात आले आहे. अशा स्थितीत बहुमत चाचणी कशी घेता येईल, असा प्रश्न कमलनाथ यांनी उपस्थित केला. तसेच अमित शाह यांना सांगून कैदेत असलेल्या आमदारांना मुक्त करावे अशी मागणी कमलनाथ यांनी राज्यपालांकडे केली आहे.

दुसरीकडे राज्याचे संसदीय कार्यमंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बजेट सत्र पुढं ढकलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून विनंती केली आहे. त्यामुळे कमलनाथ सरकारला सरकार सावरण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: digvijay singh suspects they are infected with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.