शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

डिजिटल इंडियाचे प्रयत्न निष्फळ; 70 टक्के खातेधारक रोखीवरच अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 2:57 PM

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती.

नवी दिल्ली : पुढील चार महिन्यांत देशभरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद होण्याच्या इशाऱ्यानंतर दोन वर्षांपूर्वी डिजिटल इंडियाच्या प्रयत्नांनाही खीळ बसल्याचे समोर आले आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल ट्रान्झेक्शनमध्ये प्रचंड वाढ झाल्याचा दावा करण्यात आला असला तरीही सत्यपरिस्थिती या उलट आहे.

ग्राहकांना लगेचच पैसे काढता यावेत, बँकांमधील रांग कमी व्हावी यासाठी एटीएम सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र, आरबीआयने घातलेल्या नियमांमुळे एटीएम सर्व्हिस प्रोव्हायडरना मोठा खर्च करावा लागणार आहे. एवढे मनुष्यबळ आणि कॅश व्हॅनचा ताफा परवडणारा नसल्याने सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आपला गाशा गुडाळ्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम रोजगार जाण्यावरही होणार आहे.

या पार्श्वभुमीवर नोटाबंदीला दोन वर्षे होत असताना आजही केवळ 30 टक्केच भारतीय एटीएमचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित 70 टक्के बँक खातेधारक आजही रोखीवर अवलंबून आहेत. देशातील एकूण 2.38 लाख एटीएपैकी 10 टक्के एटीएम नादुरुस्त असतात. तर 80 टक्के एटीएम ही शहरामध्येच आहेत. यामुळे ग्रामीण भागात फार कमी एटीएम उपलब्ध आहेत. 

 

महाराष्ट्रात 40 किमी गेल्यावर एटीएम सापडतेप्रगत राज्य महाराष्ट्रातही ग्रमीण भागात एटीएमची कमतरता आहे. मोठ्या शहरांमधून बाहेर आल्यास लोकांना एटीएम गाठण्यासाठी 40 किमी लांब जावे लागते. ग्रामीण भागात बँक असेल तरच त्याच्या बाजुला एटीएम सापडते. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्येही हीच स्थिती आहे. 

 

भारताचा जगात शेवटचा क्रमांकसीएटीएमआयचे संचालक बालासुब्रम्हण्यम यांच्या म्हणण्यानुसार जगाच्या तुलनेत भारतात सर्वात कमी एटीएम आहेत. येथे 1 लाख लोकांमागे 8.9 एटीएम तर ब्राझीलमध्ये 119.6, थायलंड 78, दक्षिण ऑफ्रिकेत 60 शेजारच्या मलेशियामध्ये 56.4 एटीएम आहेत. तर चीनमध्ये चक्क 10 लाख एटीएम सुरु आहेत. 2020 पर्यंत हाच आकडा 15 लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. 

टॅग्स :atmएटीएमNote Banनोटाबंदी