शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha: संसदेत आता खासदारांची 'डिजिटल हजेरी', उशिरा आल्यास पगार कापला जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:28 IST

Lok Sabha Digital Attendance: लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे.

लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून खासदारांच्या उपस्थितीसाठी 'डिजिटल हजेरी'पद्धत लागू करण्यात येणार आहे. याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली. या नवीन नियमामुळे उशिरा येणाऱ्या किंवा केवळ सही करून पळ काढणाऱ्या खासदारांना आता आर्थिक फटका बसणार आहे.

नव्या नियमानुसार, खासदारांना आता सभागृहाच्या आत आपली डिजिटल उपस्थिती नोंदवावी लागेल. जर एखादा खासदार सभागृहात पोहोचण्यापूर्वीच काही कारणास्तव कामकाज तहकूब झाले, तर संबंधित खासदाराला त्या दिवसासाठी 'अनुपस्थित' मानले जाईल. इतकेच नाही तर, अनुपस्थितीमुळे त्या दिवसाचा पगार देखील कापला जाणार आहे. आतापर्यंत खासदार सभागृहाच्या बाहेर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सही करून उपस्थिती नोंदवत असत. अनेकदा खासदार सही करून निघून जात किंवा कामकाज संपल्यानंतर हजेरी लावत. या प्रकारांना चाप लावण्यासाठी आता ही डिजिटल व्यवस्था कार्यान्वित केली जात आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माहिती दिली की, संसद आता पूर्णपणे डिजिटल होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संसदेच्या कामकाजात एआय वापर करण्याची चाचणी सध्या सुरू आहे. प्रामुख्याने खासदारांच्या भाषणांचे विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी एआयची मदत घेतली जात आहे.

सध्या एआयद्वारे होणाऱ्या भाषांतराची अचूकता तपासण्याचे काम सुरू आहे. "येत्या पावसाळी अधिवेशनापर्यंत संसदेतील भाषांतराचे काम पूर्णपणे एआय-आधारित होईल अशी आशा आहे," असे ओम बिर्ला यांनी सांगितले. यामुळे वेबसाइटवर माहिती अपलोड करण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. जे काम करण्यासाठी सध्या बराच वेळ लागतो, ते एआयमुळे अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Digital attendance in Lok Sabha; latecomers face salary cuts!

Web Summary : Lok Sabha introduces digital attendance for MPs, potentially cutting pay for tardiness. AI aids translation, aiming for efficiency by monsoon session, speeding up website updates.
टॅग्स :lok sabhaलोकसभाPoliticsराजकारणom birlaओम बिर्ला