तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:28 IST2025-06-02T12:16:51+5:302025-06-02T12:28:38+5:30
विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत...

तुम्हाला माहित्येय? पब-रेस्टॉरंटसुद्धा चालवतो विराट कोहली! आता पोलिसांनी केली मोठी कारवाई; स्टार क्रिकेटर अडचणीत
बंगळुरू पोलीसांनी स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या पब-रेस्टॉरंटवर मोठी काराई केली आहे. कोहलीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंटमध्ये नो स्मोकिंग झोन नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात केस दाखल केली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप क्रिकेटर विराट कोहली अथवा सेस्टॉरंटकडून कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यात आलेले नाही.
खरे तर बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी एका विशेष अभियानांतर्गत एकूण 5 बार आणि रेस्टॉरंटविरोधात कारवाई केली आहे. यात विराट कोहलीच्या मालकीच्या One8 Commune पब आणि रेस्टॉरंटचाही समावेश आहे. या पबमध्ये नो स्मोकिंग झोन नाही, असे पोलिसांना आढळून आले. यामुळे त्यांनी, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या (COTPA) तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल स्वतःहूनच केस दाखल केली आहे.
नियम मोडल्याने करण्यात आली कारवाई -
कोहलीच्या पबवर कायदेशीर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यातही One8 Commune पब आणि रेस्टॉरंट विरोधात केस दाखल केली होती. जुलै, 2024 मद्ये One8 Commune पबच्या मॅनेजरवर, पब बंद करण्यासंदर्भातील वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्यावरून एफआयआर दाखल करण्यात आली होती. कब्बन पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, कस्तूरबा रोडवरील वन8 कम्यून पब 6 जुलैला बंद करण्याच्या वेळेनंतरही, 1.20 वाजेपर्यंत खुलाच होता आणि ग्राहकांना सर्व्हिस देत होता.
दिल्ली, मुंबई आणि पुण्यातही रेस्टॉरंटच्या शाखा-
विराट कोहली हा वन8 कम्यूनचा मालक आहे. या रेस्टॉरंटच्या शाखा दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि गुरुग्राम सारख्या शहरांत आहेत. हे रेस्टॉरंट बंगळुरू येथे डिसेंबर, 2023 ला सुरू करण्यात आले आहे.