दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:53 IST2025-11-12T16:50:41+5:302025-11-12T16:53:33+5:30
दिल्लीतील स्फोट प्रकरणाची सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. संशयीताकडे फक्त i20 कार होती की आणखी कोणती कार होती याचा तपास सुरू केला आहे.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
सोमवारी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. देशभरातील विविध राज्यांमध्ये सतत छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी आतापर्यंत १८ हून अधिक लोकांना अटक केली आहे. या स्फोटा प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संशयिताकडे i20 कार शिवाय आणखी एक कार होती. पोलिस आता लाल फोर्ड इकोस्पोर्टचा शोध घेत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरयाणा येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. रॉयल कार झोनच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयितांकडे i20 कार व्यतिरिक्त आणखी एक कार होती. यानंतर, दिल्लीतील सर्व पोलिस ठाणी, पोलिस चौक्या आणि सीमा चौक्यांना सतर्क करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी सर्व पथकांना लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट कार शोधण्याचे निर्देश दिले आहेत. पाच पथके आता विविध भागात सतत शोध मोहीम राबवत आहेत. उत्तर प्रदेश आणि हरयाणामधील पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. जवळच्या टोल प्लाझावरूनही कारची माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी फरीदाबाद येथील एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ प्रदूषण तपासणीपूर्वीच्या पेट्रोल पंपाजवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कारमध्ये तीन लोक दिसत आहेत. तपास यंत्रणांच्या मते, उमर आणि तारिक हे स्वतः प्रदूषण तपासणी करण्यासाठी आले होते.
फुटेजमध्ये एक मिनिट आणि पाच सेकंदात, उमर आणि तारिक दोघेजण बॅगा घेऊन जाताना दिसतात. पोलिस आता त्यांच्या कारवायांची चौकशी करत आहेत. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी रॉयल कार झोनच्या मालकाला ताब्यात घेतले आहे.