'रावणाच्या खानदानातील लोक'; उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'त्या' वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्री भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:28 PM2023-09-04T15:28:18+5:302023-09-04T15:30:15+5:30

उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी उदयनिधी यांना 'रावणाच्या खांनदानातील लोक' असे म्हटले आहे.

Dhirendra krishna shastri comment about DMK udhayanidhi stalin's remarks over sanatana dharma | 'रावणाच्या खानदानातील लोक'; उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'त्या' वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्री भडकले

'रावणाच्या खानदानातील लोक'; उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'त्या' वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्री भडकले

googlenewsNext

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या 'सनातन धर्म नष्ट' करण्यासंदर्भातील वक्तव्यावरून वाद सातत्याने वाढतानाच दिसत आहे. उदयनिधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आता धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी उदयनिधी यांना 'रावणाच्या खांनदानातील लोक' असे म्हटले आहे.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "रावणाच्या खानदानातील लोक आहेत. जर भारतात राहणाऱ्या एखाद्या भारतीयाने असे म्हटले असेल, तर भारतात राहणाऱ्या संपूर्ण सनातनी लोकांच्या हृदयावर त्यांना आघात केला आहे. हा प्रभू रामचंद्रांचा देश आहे या भूमीवर सूर्य आणि पाणी राहील तोवर सनातन राहील. असे लोक भरपूर आले आणि गेले. अशा जनावरांना उत्तर देण्याची गरज नाही.''

'सनातन धर्मा'वर वादाग्रस्त वक्तव्यांवर उदयनिधी स्टॅलिन विरोधात दिल्ली पोलिसात दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदल आणि हिंदू सेना प्रमुख विष्णु गुप्ता यांनी दाखलकेल्या आहेत.

अपल्या वादग्रस्त वक्तव्यावर उदयनिधी कायम- 
तामिळनाडूचे मुख्यंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी  सनातनसंदर्भात केलेल्या वक्तव्यानतंर, ते राजकीय विरोधकांच्या शिण्यावर आले आहेत. असे असतानाही ते आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. उदयनिधी यांनी सनातन धर्म नष्ट करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. 
 

Web Title: Dhirendra krishna shastri comment about DMK udhayanidhi stalin's remarks over sanatana dharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.