शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

संसदेमध्ये नाही चालला ‘ढाई किलो का हाथ’, मतदारसंघातही फिरकले नाहीत, विचारला केवळ एक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:21 AM

Sunny Deol: ‘यह ढाई किलो का हाथ किसी पर पडता हैं तो आदमी उठता नहीं उठ जाता हैं’ अशा अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या डायलॉगमुळे लाेकप्रिय झालेले अभिनेता तथा खासदार सनी देओल यांचा बोलबाला संसदेत मात्र चालला नाही.

- प्रसाद आर्वीकरचंडीगड - ‘यह ढाई किलो का हाथ किसी पर पडता हैं तो आदमी उठता नहीं उठ जाता हैं’ अशा अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या डायलॉगमुळे लाेकप्रिय झालेले अभिनेता तथा खासदार सनी देओल यांचा बोलबाला संसदेत मात्र चालला नाही. संपूर्ण पाच वर्षांत संसदेत त्यांनी केवळ एक प्रश्न विचारला. परिणामी, सनी देओल यांना यावेळी खासदारकीचे तिकीट गमवावे लागले आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून सनी देओल यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी सनी देओल यांनी काँग्रेसचे तत्कालीन खासदार सुनीलकुमार जाखड यांचा ८२ हजार मतांनी पराभव केला होता. लोकांनी सनी देओल यांना संसदेत पाठवले खरे; पण खासदार सनी पाजी यांनी असमाधानकारक कामगिरी केली. मतदारसंघातही ते फिरकले नाहीत. नागरिकांचीही त्यांच्यावर नाराजी हाेती. देशप्रेम आणि अन्यायाविरुद्ध लढणारा युवक, अशा भूमिका त्यांनी चित्रपटांतून केल्या. मात्र, त्यांची जादू संसदेत चालली नाही. सनी देओल यांनी एका मुलाखतीत अभिनेता राहण्यालाच पसंती असल्याचे सांगितले आहे. 

किती हाेती लाेकसभेत उपस्थिती?- पीआरएस लाॅजेस्टिक रिसर्च या सेवाभावी संस्थेने काही दिवसांपूर्वी एक सर्वेक्षण केले.- त्यात गुरुदासपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार सनी देओल यांची संसदेतील उपस्थिती चार वर्षांत केवळ १८ टक्के एवढी राहिली. 

ज्यांचा पराभव केला त्यांनीच कापले तिकीट- २०१९ मध्ये सन्नी देओल यांनी त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार आणि  खासदार सुनीलकुमार जाखड यांचा पराभव केला होता.- जाखड यांनी त्यानंतर परत भाजपात प्रवेश केला. या काळात जाखड यांच्या कार्याची दखल घेत भाजपाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली. -त्यात भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांनी सनी देओल यांचे तिकीट कापले आणि गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून दिनेशसिंह बब्बू यांना उमेदवारी जाहीर केली.

टॅग्स :Sunny Deolसनी देओलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४punjab Lok Sabha Election 2024Punjab Lok Sabha Election 2024