डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:24 IST2025-06-05T14:24:22+5:302025-06-05T14:24:58+5:30

नागरी विमान वाहतूक महासंचालकने चार विमानतळांवर तुर्कीच्या विमानांची झाडाझडती घेतली होती. यामध्ये एका विमानात स्फोटक पदार्थ सापडले आहेत.

DGCA's surprise raid creates a stir! Explosives found on Turkish Airlines plane | डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले

डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले

ऑपरेशन सिंदूरवेळी भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानच्या एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडून आले आहेत. डीजीसीएने अचानक केलेल्या तपासणीत तुर्कीच्या विमानांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या असून या एअरलाईनना भारतीय नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

नागरी विमान वाहतूक महासंचालकने चार विमानतळांवर तुर्कीच्या विमानांची झाडाझडती घेतली होती. यामध्ये एका विमानात स्फोटक पदार्थ सापडले आहेत. या प्रकरणाची चौकशी किंवा खुलासा करण्यात आला नसला तरी नियमांचे पालन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा असल्याने तुर्की आता शत्रू देशांच्या संशयितांच्या यादीत गेला आहे. दिल्ली, हैदराबाद, चेन्नई आणि बंगळुरु विमानतळांवरील तुर्कीच्या एअरलाईन्सच्या विमानांची २९ मे ते २ जून अशा काळात झडती घेण्यात आली. यामध्ये प्रवासी आणि कार्गो विमानांचे सुरक्षा तपासणी आणि रँपचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये स्फोटक पदार्थ सापडल्याने तुर्कीच्या विमानांवर डीजीसीए यापुढेही लक्ष ठेवणार आहे. 

विमान वाहतूक मंत्रालयाने यावर माहिती दिली आहे. तुर्कीच्या विमानामध्ये अशा प्रकारच्या धोकादायक वस्तू होत्या, ज्यांची भारतात किंवा भारतातून वाहतूक करण्यासाठी डीजीसीएची परवानगी गरजेची असते. तुर्कीच्या या विमान कंपनीने अशाप्रकारची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. तसेच त्या धोकादायक वस्तूंच्या त्यांनी कळविलेल्या यादीत त्यांचा उल्लेखही नव्हता. एवढेच नव्हे तर अन्य बाबतींतही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. 

तुर्कीच्या एअरलाईन्सकडून नियम धाब्यावर...

तुर्कीच्या एअरलाईन्सच्या ग्राउंड हँडलिंग एजंटमध्ये कोणताही करार झाला नव्हता. ग्राउंड ऑपरेशन्स हाताळणाऱ्या मार्शलरकडे मार्शलिंग ऑपरेशन्ससाठी योग्य अधिकृतता आणि वैध पात्रता कार्ड नव्हते. जेव्हा विमान येते तेव्हा कंपनीचा अभियंता तिथे उपस्थित असणे गरजेचे असते. परंतू, तिथे तंत्रज्ञांकडून ही आगमन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 

Web Title: DGCA's surprise raid creates a stir! Explosives found on Turkish Airlines plane