कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:06 IST2025-01-16T05:42:04+5:302025-01-16T07:06:21+5:30
सोमवारी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

कडाक्याच्या थंडीचा बाऊ न करता भाविकांनी केले पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात तिसऱ्या दिवशीही असंख्य भाविक
महाकुंभ नगर : कडाक्याच्या थंडीतही बुधवारी पहाटेपासून असंख्य भाविकांनी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले. त्यावेळी भाविकांनी दिलेल्या हर हर महादेव, जय श्रीराम, आणि जय गंगामय्या या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील रहिवासी निबार चौधरी म्हणाले की, त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळ्यात मी पहिल्यांदाच पवित्र स्नान केले असून त्यामुळे मला अतिशय प्रसन्न वाटत आहे. सोमवारी सुरू झालेला हा मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
अनेक देशांतून कुंभमेळा पहायला आले प्रतिनिधी
महाकुंभमेळ्यासाठी २१ सदस्यांचे शिष्टमंडळ उद्या, गुरुवारी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार आहे.
फिजी, फिनलंड, गियाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो, यूएई तील प्रतिनिधींचा या शिष्टमंडळात समावेश आहे. त्यांना सरकारने आमंत्रित केले आहे.